Er Rational musings #297
~ चणे, शेंगदाणे, चणा डाळ...
~ चुरमुरे, शेव, सुकी भेळ, ओली भेळ...
~ पाणी पूरी, शेव पूरी, दही बटाटा पूरी, रगडा पँटीस...
~ बटाटा वडा, कांदा भजी, मिरची भजी, बटाटा भजी, पँटीस, मूग भजी, डाळ वडा, समोसा...
~ कच्छी दाबेली...
~ पाव भाजी, तवा पुलाव...
~ इडली सांबार, वडा सांबार, सादा मसाला म्हैसूर रवा डोसा, उत्तप्पा, ओनियन उत्तप्पा...
~ सँडविच...
~ बूढ्ढीके बाल, बर्फाचा गोळा, कालाखट्टा आँरेंज मिक्स चम्मच, कूल्फी, आईसक्रीम, सरबत...
~ आँमलेट, हाफ फ्राय, भूर्जी, बाँईल्ड एग...
~ चिकन, मटण, पाया सूप, खिमा, तंदूरी, कलेजी, पोट्टा, बिर्याणी...
हे सगळं रस्त्यांवरील गाड्यांवर खात खातच आम्ही मोठे झालोय. बाहेर खाणं, चमचमीत खाणं हा आमचा स्थायीभावच आहे. जीभेचे अनिवार्य चोचले. खाण्यावर नितांत प्रेम करणार्यांनी फक्त खात रहावं. रहायला पाहीजे ना?!
त्यात आता कालानुसार अँडिशन झालीये ती
~ फ्रँकी, पिझ्झा, चायनीज भेळ, सूप, हाँट डाँग, फ्राईड राईस, नूडल्स, बर्गर इ इ यांची..
खाणे, खा खा खा खाणे. नवनवीन गाड्या शोधून खाणे. हापसणे. आक्ताचच उदाहरण घ्या. सगळ्या खाऊ गल्या डोळ्यांसमोर उभ्या राहील्या की नाही? तोंडाला पाणी सुटलं की नाही? नकळत आपण विचार करतोय की कुठला पदार्थ मेन्शन करायचा राह्यलाय का? हो की नाही?
परंतु देवाने मोठ्ठा अन्याय केलाय बुवा आम्हा खादाडखाऊंवर.
उदाहरणार्थ बघा: आपल्या डोक्यावर केस येतात, वाढतात, मग आपण ट्रिम करतो ना सलूनमध्ये जावुन. परत वाढतात. काही विरळ होतात. मग काही दिवसांनी परत हेच चक्र. हो की नाही?
अँक्च्यूअली, दातांचे पण असेच हवे होते. दात वाढले, की ट्रिम करायचे; दूखायला लागला, काढून टाकायचा. एखादा पडलाच की तिथे दूसरा नवीन दात हजर! विदीन 8-10 days!! असे हवे होते. शेवटपर्यंत सगळं व्यवस्थित सारखं खाता आलं पाहीजे!
बहुत ना-इन्साफी हैं भाई...
---
मिलिंद काळे, 29th December 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment