Er Rational musings #292
तीन कर्तबगार मुली आणि मी
आज UT (पूर्वाश्रमीची) प्रत्यक्ष भेटली. 1980 नंतर आत्ता, म्हणजे 35 वर्षांनी. बरोबर JJ (पूर्वाश्रमीची) व SW ( पूर्वाश्रमीची)!
छानशा गप्पा रंगल्या. आता लक्षात येतय की शाळेतली वर्ष मुलं मुली एकमेकांशी न बोलण्यातच गेली. आमच्या कडे ते फारच कडक 'पथ्य' पाळलं जायचं. दहावी त सुध्दा आम्ही एकमेकांशी अत्तिशय कमी वेळा समोरासमोर बोललो असू! आता किती हास्यास्पद वाटत ना ऐकायला?! असो.
2007 साली आमचं जाँईंट रि-युनियन आम्हीच अरेंज केलं. तेव्हापासून, दर वर्षी एकदा आवर्जून न चूकता एकत्र येतो. दीड दिवस व एक रात्र नूसती ध्धमाल करतो. पूण्यातले मित्र मैत्रिणी मुलुंड ला आल्या किंवा आम्ही कोणी इकडून पूण्यात गेलो की जेव्हढे लोक्स येतील, ज्यांना जमेल त्यांच्याबरोबर भेटून 1-2 तास नुसता कल्ला करतो. बर वाटतं. कळत नकळत आम्ही एवढे एकमेकांशी जोडले गेलो, मैत्रीचं नातं घट्ट विणलं गेलं, विणलं जातय.
आणि ह्याला हातभार, नव्हे बळकटी, टेक्नोलॉजीची. व्हॉट्सऍप सारख्या प्रभावी माध्यमामुळे आमचे परदेशी बँचमेट्स पण जोडले गेले.
ह्या परदेशी मित्र मैत्रिणींना भेटायचे प्रसंग अविस्मरणीय.
UTची भेट अशीच. अनपेक्षित अचानक नव्हे, पण काहीस तसच. तिने आमच्या ग्रूप वर तिच्या आगमनाचे सुतोवाच केलच होतं. त्यानुसार ठरल्या प्रमाणे तिला कालच भेटलो, इतक्या कालावधी नंतर अशी भेट जेव्हा होते तेव्हा कसं वाटत, ही अनुभवायची चीज आहे. बर, माझ्याबरोबर JJ व SW. झालं, मग काय, आत्तापर्यंतचा प्रवास, मुलं मुली, आई, वडील, खुशाली, हजर नसलेले सवंगडी - त्यांची इत्यंभूत खुसखुशीत चर्चा (!), थोडं सिरियस, मोस्टली कँज्युअल पण खरीखुरी मनातली देवाणघेवाण, हास्य विनोद, मर्म नर्म चिमटे, वगैरे वगैरे, पण एकंदरीत मजा आली.
It was a pleasure to meet, talk, discuss n hear about these three very talented ladies, sorry, gals.
आपापल्या क्षेत्रात पारंगत. उच्चपदस्थ, कर्तबगार मुली. स्वत:ची, मुला मुलींची, नवरा, आई वडील, सासू सासरे यांची व्यवस्थित काळजी घेत घेत या मुली एव्हढ्या समाधानी आहेत, हे बघून खूपच आनंद झाला. यांच्यामधला उत्साह वाखाणण्याजोगाच आहे. कौतुक करावे तेव्हढे कमीच.
आऊटडोअर हिरवळी चे हाँटेल, मंद बँकग्राऊंडला म्युझिक, आल्हाददायक हवा, गरमा गरम सूप, व बरोबर गरम स्नँक्स, व बरोबर round table affectionate conference, आणि या तिघीं बरोबर मी!
What a combination!
---
मिलिंद काळे, 27th December 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment