Tuesday, December 22, 2015

Er Rational musings #281

Er Rational musings #281



मनात एक मस्तानी....!

………………………………………



प्रत्येकाच्या मनात

एक मस्तानी असते...

पहिल्या वहिल्या सच्च्या

प्रेमात पडल्याची साक्ष असते!



एक छानशी, लाडकी आवडती

हवीहवीशी आठवण असते

एकतर्फीच ठरलेली सोसलेली

प्रयत्नांची पराकाष्ठा असते



झुरलेल्या भ्रमरासाठी

नकाराची व्यथा असते

जीवापाड जडलेली प्रीत

अधूरी एक कहाणीच असते



उत्कट प्रेमाशी अनभिज्ञ तेव्हाही मस्तानीच असते

कारण निष्ठूर भावनाशून्य नियतीच असते

एकएकांतात उलगडणारी जखमेवरची खपली जरी असते

तरीही बाजीरावाची ही 'लढाई' मात्र 'टाय' असते



प्रत्येकाच्या मनात

एकतरी मस्तानी असते...

पहिल्या वहिल्या सच्च्या

प्रेमात बुडल्याची साक्ष असते...

--

मिलिंद काळे, 21st December 2015

No comments:

Post a Comment