Tuesday, December 22, 2015

Er Rational musings #282

Er Rational musings #282



~ हल्ली खंडाळा घाट 15 ते 20 मिनिटांत पार होतो, पूण्याकडे जाताना किंवा मुंबई कडे येताना. पूर्वी बोरघाट 2 पदरी असताना मात्र खडतर समजला जायचा. लोणावळ्याकडे वर जाताना, उजव्या बाजूला एक मंदिर लागायचं. मग सगळे प्रवासी, मग ते एसटी तले असोत वा कार मधले वा ट्रक टेंपो चालक वा दूचाकीस्वार, हात खिडकीच्या बाहेर काढून चार आठ आणे, रूपया दोन रूपयांची नाणी अक्षरश: फेकायचे. फेकलेले पैसे चालत्या गाडीतून बरोब्बर दर्शनी प्रवेशद्वारातून मूर्तीच्या पायाशी पडले तर कृत:कृत्य झाल्याचे भाव चेहऱ्यावर यायचे व लोक्स चा आनंद ओसंडून वहायचा.



मनुष्यप्राणी व श्रध्दा यांचे अनादि कालापासून अतूट नाते आहे...



~ ठाणे स्वारगेट सेमी लक्झरी एशियाड सूरू झाली. आसन व्यवस्था टू बाय थ्री. अँडव्हान्स बूकींग निमित्ताने एक फेरी ठाण्याला. ठाणे पूणे प्रवास पाच तासावर आला. 3 तास लोणावळा व पूढे 2 तास स्वारगेट. त्या आधी कधी कधी पनवेल, खोपोली, लोणावळा, चिंचवड, शिवाजीनगर असा टप्याटप्याचा प्रवास. ठाणे स्थानका समोरील वडा पाव तर लोणावळा बस स्थानका वरचं ऊसाच गुऱ्हाळ! आणि आता?



प्रातिनिधिक स्वरूपात; बदल, प्रगती, परंतू अपरिहार्य आठवणी...

---

मिलिंद काळे, 22nd December 2015

No comments:

Post a Comment