Wednesday, December 23, 2015

Er Rational musings #286

Er Rational musings #286



Government techniques...



आँफिसला वेळेवर पोहचा. दरवाज्यातून आत शिरल्या शिरल्या देवाच्या मूर्तीला/फोटोला व आपल्या टेबलावरच्या ग्लासच्या खाली ठेवलेल्या श्रध्दास्थानांना नमस्कार चमत्कार लवकर उरका, व कामाला लागा.



कँटीनच्या वाऱ्या कमी करा. दूसऱ्या सेक्शन मध्ये जाऊन उगीचच टाईमपास करू नका. मान मोडून कामे करा. जनतेच्या पैशातून, करांतून आपल्याला पगार, प्रामाणिक कामाचा मोबदला मिळतो, हे कायम स्वरूपी मनात बिंबवा.



लंचला वेळेआधी जाऊ नका. लंच नंतर पाय मोकळे करायला, रस्त्यावर केळं घ्यायला/खायला, पान खायला, सिगारेट फूंकायला, गप्पा मारायला जायला हरकत नाही, परंतु वेळेत आपापल्या कामाच्या जागी पोहचा.



जोडीने/घोळक्याने प्रसाधनगृहात सारखे सारखे, ऊठसूट कटायचे, साँरी, जायचे टाळा!



आपापल्या फाईली, पेपर्स नीट ठेवा. इतर सहकाऱ्यांशी फालतू विषयांवर चर्चा करत टाईमपास करू नका. कामं घेऊन ताटकळत तिष्ठत बसून जेरीस आलेल्या लोक्सशी आपुलकीने वागा व त्यांचे शंकानिरसन करण्याचा, त्यांनी आणलेलं काम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. अंडर द टेबल डिलींग्ज करू नका. असा प्रयत्न करणाऱ्या सहकारी कर्मचाऱ्यांना असं करण्यापासून परावृत्त करा. सचोटी, पारदर्शकता, प्रामाणिकपणा इ गुणांचं सतत अवलंबन करा. एखाद्या गोष्टीचा पाठपूरावा नीट करा.



आँफिस बंद व्हायच्या आधीचा अर्धा पाऊण एक तास अतिशय महत्वाचा असतो हे लक्षात ठेवा. खासकरून, या वेळेत जनरल टि पी, कँटिन व्हिजीट, फार वेळ प्रसाधनगृहाचा वापर, व्हॉट्सऍप चा अतिरिक्त यूज, शक्यतो टाळा.



सातव्या वेतन आयोगाला सार्थ अभिमान वाटेल असे व असेच कायम वर्तन वागणूक व्यवहार ठेवा!

---

मिलिंद काळे, 24th December 2015

No comments:

Post a Comment