Er Rational musings #272
गिऱ्हाईक असलं की ह्यांच पायलट मध्ये रुपांतर होतं आणि यांच्या वाहनाचं विमानात. त्यातनं जर सकाळची वेळ असेल तर डायरेक्ट सूपर साँनीक जेट विमान!
गिऱ्हाईक नसलं की यांच्या वाहनाचं बैलगाड़ीत रूपांतर होतं. त्यातनं जर दूपारची वेळ असेल तर झोपेत चालणाऱ्या बैलांनी ओढलेली बैलगाडी आणि यांच रूपांतर तंद्रीतला बैलगाडी हाकणारा!
पावसाळ्यात किंवा रेल्वे बंद असताना किंवा बेस्ट बसेस चा संप असताना किंवा आपत्कालिन परिस्थितित किंवा ईमर्जन्सी असताना ह्यांच रूपांतर धूमकेतू किंवा धृव ताऱ्यात किंवा ईद का चाँद मध्ये होतं.
ट्रँफिक मध्ये यांच रूपांतर उंदीरा मध्ये होतं. फूगीर आकारामूळे मुंडकं घुसवलं की सगळी बाँडी इकडून तिकडून का होईना, पूढे काढता येते.
तुम्हाला जवळच जायचं असेल तर यांच रूपांतर नंदी बैलात होत. आणि रात्रीच्या वेळी यांच रूपांतर मर्सिडीज गाडीत होतं. आणि मधून मधून वरचेवर (!) यांच रूपांतर वेड्यावाकड्या सरपटणाऱ्या सापात होतं.
ढूंगणा खालचं इंजिन गेलं, आता रिअर इंजिन आलं, तरी यांची तिरकी बसायची सवय गेलेली नाहीये!!
दूसरंतिसरं कोण असणार?
अहो, आपला फ्रेंडली नेबरहूड स्पायडरमँन, साँरी, रिक्शावाला!! मुंबईचा रिक्शावाला!!
---
मिलिंद काळे, 18th December 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment