Er Rational musings #257
व्हॉट्सऍप
अन्न, वस्त्र, निवारा आणि व्हॉट्सऍप! अगदी खरय. उगाचच ताकास जाऊन भांडे का लपवायचे? आजचे चलनी नाणे. जीवनावश्यक कमोडिटी.
म्हणो ना कोणी काही. हिणवो ना कसेही. करू दे ना कोणी टिंगल टवाळी, उडवू दे ना कोणी नाक, वा असू दे गमतीचा, चेष्टेचा विषय; हे एक मास कम्युनिकेशन चे अत्यंत प्रभावी माध्यम आहे, हे मान्यच करावं लागेल.
स्पीड, रीच (म्हणजे कक्षा, फैलाव या अर्थी), ईज आँफ अँक्सेस, इन हँड्स आँफ मासेस! (फिश नव्हे!).
यात सगळ्या सुविधा आहेत. एखाद्या काँटँक्ट चे, ग्रूप चे संभाषण म्यूट करायचेय, करा. तुम्हाला इनव्हिजीबल रहायचय, रहा. स्टेट्स द्वारे, प्रोफाईल पिक्चर द्वारे काही संदेश द्यायचाय, काही सूचीत करायचय, करा. आलेले व्हिडियोज व इमेजेस आपोआप उघडायला नको आहेत, स्ट्रेटअवे गँलरीत जायला नको आहेत, सेटींग मध्ये प्रोव्हीजन आहे. एकदम सगळं काँन्व्हरसेशन, मेसेजेस पोस्ट्स डिलीट, क्लियर करायच्या आहेत, करा. सर्च करा, ई-मेल करा, ब्लाँक करा....अरे सगळं सगळं करणं शक्य आहे.
प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, टूगेदरनेस, विश्वास, वाढवण्याचं, टिकवण्याचं सोप्पं सुलभ साधन. चांगलं ते घ्या. बाकी आहेच की!!
हँप्पी व्हॉट्सऍपींग...
---
मिलिंद काळे, 10th December 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment