Tuesday, December 1, 2015

Er Rational musings #143

Er Rational musings #143



आठवणींचा ठेवा साठवणींचा



मुलुंड यार मुलुंड, बाकी सगळं झक मारत राव.



असंख्य अनंत प्रसंग, न विसरण्याचे, पुसताच, विसरताच न येणारे.



पश्चिम म्हणजे 2 उभे रस्ते, 2 आडवे रस्ते, भाजी मार्केट, डंपिंग रोड, सिमेंट कंपनी, काँमर्स काँलेज, डोंगर व तीन थेटरं, व छाया पंजाब, संदीप, क्षूधा शांती ही हाँटेलं व शंविहिंहाँ (शंकर विलास हिंदू हाँटेलं! tea cigaree) बस्स संपलं. मेन मेन.



पूर्व म्हणजे 1 गोल रस्ता, आर पी एफ ग्राऊंड, 2 पाडे, 1 मिठागर, 1 हायवे कडे जाणारा रस्ता, 1 थिएटर, 2 ट्यूशन क्लासेस व प्रशांत हाँटेल व माझी - आपली शाळा. मेन मेन.



पूर्व पश्चिम रेल्वे खालचा रस्ता महत्वाचा. पाम एकर्स साईडचा. दोन टोकांना 2 रेल्वे क्राँसींग्ज.



नववी दहावीतली मजा वेगळीच होती.



~ सरांचे क्लासेस. पश्चिमेला रहायला असल्याने, कधी कधी सायकल आणली की रेल्वे लाईन वरून उचलून, हातात धरून क्राँस करायला लागायचं कुठून तर आत्ताचं अतिथी हाँटेल आहे ना, त्याच्या समोरून.

~ मित्राच्या वडीलांची चोरलेली एक (!) सिगारेट डनहिल वा फाय फाय फाय ओढायला आम्ही दोघं हायवेवर (!) जायचो. भांडूपच्या दिशेने राईट मारला की एक पंप हाऊस होतं, त्याच्या पाठी!! सिमेंट कंपनी मध्ये सायकल वरून पण यायचो, स्मोकींग जाँईंट!

~ वर्गात लास्ट बेंच वर बसून वाँटर बाँटल मधून भरून आणलेली 'पाणी' प्यायलेलं आंठवतय.

~ आपल्या शाळेच पीटी चे भव्य पटांगण म्हणजे जे पी एम कडचा रस्ता व नंतर शाळेची गच्ची.

~ आवडता मेनू, एक क्वार्टर ओल्ड माँक (दोघांत) व तंदूरी चिकन! छाया पंजाब मध्ये (आत्ताचं आमंत्रण, मेहूल समोरचं.)

~ गणेश टाँकीज ला चंदू नावाचा एक लंबू दादा तिकीटे ब्लँक ने विकायचा. गणेश टाँकीज ला स्टाँल, बाल्कनी बरोबर बाँक्स पण होता.

~ क्रिकेट खेळायला आर पी एफ वा पश्चिम चे बाबा पदमसिंह (आत्ताचं कालिदास). इथे एकावेळी 10-12 मँचेस चालायच्या - एका मँचमधला कव्हर चा फिल्डर दूसऱ्याच्या मधे!

~ पहिली रिक्शा वेस्ट ला आली, तो रिक्शावाला एकदम हिरो होता. रिक्शावर "झोरो" असं लिहीलेले होते.

~ आमचं रात्री आठ साडे आठला अचानक ठरायचं, मग पटापट जेवणं आटोपून नऊ ते बारा दीपमंदीर किंवा मेहूल ला सिनेमा बघायला पळायचो. सिनेमांची जाहीरात स्टेशन बाहेर लागायची (पूर्वीचं विश्व महाल, आत्ताचं मँक डी च्या समोर).

~ सूयोग सोसायटी मधली नाटकं व इतर कार्यक्रम, आपलं गॅदरींग वगैरे, व्वा!

~ गच्यीवरचं क्रिकेट, खाली बाँल गेला की आऊट, एक टप्पी आऊट...

~ शाळेतल्या पिकनीका, सहली, खासकरून बोर्डी.

~ मित्राच्या घरी नाईट्स मारल्यात सो काँल्ड अभ्यासाच्या निमित्ताने.

~ लायन्स क्लब मधलं टेबल टेनिस व बँडमिंटन.

~ वेस्ट वरनं आम्ही पाच सहाच जणं..



असेच अवांतर, सविस्तर, काही काहीही बरेच काही, पण सगळे कसे लिहीणार?



मुलुंड... 50 वर्षे गेली बघता बघता.



तळटीप:



आणि मुला मुलींच्या लावलेल्या जोड्या!! शाळेतल्या, वर्गातल्या, क्लास मघल्या, वामनराव x पुरंदरे मधल्या. काही जमल्या, काही राह्यल्या!]



हं...

---

मिलिंद काळे, 1st December 2015

No comments:

Post a Comment