Er Rational musings #260
ऐशी नव्वद च्या दशकांत गज़ल ऐकायचं वेड लागवलं एका कलाकार मित्रामुळे. त्याच्या घरी या एलपीज (लाँग प्ले) ऐकायला मजा यायची. खास करून गुलाम अली.
~ चूपके चूपके रात दीन, आँसू बहानाs याद़ हैं...
~ हंगामा हैं क्यूँ बरपाs थोडी़सी जो पी ली है...
~ ये दिल ये पागल दिल मेरा, क्यूँ बूझ गया आवारगी...
मग नंतर, दारूच्या पार्ट्यांच्या वेळेस बँकग्राऊंडला गज़ल्स! काय मस्त मजा यायची.
नंतर अँडिशन झाली ती सुरेश भटांची.
~ तरूण आहे रात्र अजूनी...
~ मालवून टाक दीप...
~ मलमली तारूण्य माझे...
~ केव्हा तरी पहाटे...
~ चांदण्यात फिरताना...
नंतर अँडिशन झाली किशोर एसडी आरडी यांची. लता आशा, रफी, ओपी (अर्थातच विदाऊट लता!), आणि सगळेच...
एक चसकाच लागला होता आम्हाला.
आत्ताची पिढी सगळ्याला मुकतीये. कसली बेंबीच्या देठापासून रेकलेली गाणी, आणि काय गायक आणि काय गीत (!) कार आणि काय (कप्पाळ) संगीतकार! आठ दिवसांपेक्षा लाईफ नसतं!!
(चूभूद्याघ्या - काही सन्माननीय अपवाद वगळता, चूक भूल द्यावी घ्यावी)
---
मिलिंद काळे, 11th December 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment