Saturday, November 7, 2015

Er Rational musings #88

Er Rational musings #88



आमच्या लहानपणी, एकमेकात बोलायच्या सांकेतिक भाषा असायच्या. म्हणजे, मोठ्यांच्या बरोबर असताना किंवा अनोळखी मुलांबरोबर असताना, त्यांना समजू नये म्हणून फटाफट अशा भाषेत आम्ही बोलायचो. किंवा नूसतेही, असेच भेटलो तरी चक्क अशा भाषेत गप्पा मारायचो!



उदाहरणार्थ, "आपण संध्याकाळी चार वाजता हाँटेल भारत मध्ये भेटूया", हे वाक्य कसे बोलायचो बघा:



'च' ची भाषा

चापणआ चंध्याकाळीस चारचा चाजतावा चाँटेलहाँ चारतभा चध्येम चेटूयाभे.



'पट' ची भाषा

आपटपपटणपट संपटध्यापटकापटळीपट चापटरपट वापटजपटतापट हाँपटटेपटलपट भापटरपटतपट मपटध्येपट भेपटटूपटयापट.



'उलट' बोलण्या ची भाषा

पाअण ध्यंसाकाळी राच जावता टाँहेल राभत ध्यमे टेभूया.



व तत्सम, इतर.



आहे की नाही मजेशीर. वेगळीच गंमत. मजा यायची. आणि एव्हढे फ्ल्यूएंटली, फास्ट बोलायचो. बोली भाषा च झाल्या होत्या आमच्या, अल्मोस्ट!



क्या बात हैं.

---

मिलिंद काळे, 8th November 2015

No comments:

Post a Comment