Er Rational musings #129
रमेश देव
सहजसुंदर अभिनय; पडद्यावरील नँचरल वावर; दिलखुलास, मिश्कील व छद्मी हास्य (हे एकाच वेळी सर्व!); अंतरंग जाणतायत का काय असे भावस्पर्शी डोळे; भारदस्त धारधार आवाज; छान खरीखूरी उंची; पेटंटेड वाटावी अशी कट मिशी (ते सुध्दा या मुछमुंढ्या फिल्मी जगतात!); कुठल्याही पेहेरावात आदब आणणारे व्यक्तिमत्त्व!
एक वेगळेच अस्तित्व! पण...
रमेश देव असे लिहीले की पूढे सीमा, आपोआप येते. आणि मनातल्या मनात असेच वाचले जाते, म्हटले जाते. नँचरल केमिस्ट्री, पडद्यावर व सहजीवनात.
"डिग्नीफाईड इनसेपरेबल जोडी" असंच यांचे वर्णन करावे लागेल...!! नँचरली स्पिकींग.
पहिला वहिला "मराठी" फिल्म फेअर अँवार्ड सोहळा. अशा या कलाकाराला लाईफ टाईम अँचिव्हमेंट अँवार्ड देऊन त्यांचा, त्यांच्या कारकिर्दीचा यथोचित गौरव करणं, हे अत्यंत योग्य.
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा!
---
मिलिंद काळे, 22nd November 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment