Er Rational musings #117
भृंगराज कामेश्वर गुग्गुळ.
आयुर्वेदिक काढा नाहीये, तेल नाहीये व औषध ही नाहीये.
असंच आत्ता आठवण झाली ती आत्माराम भेंडे यांची. 'भृंगराज कामेश्वर गुग्गुळ' उर्फ आत्माराम भेंडे. घरोघरी मातीच्या चूली या फार्स मधली अक्षरश: अजरामर भूमिका; पात्राचे नाव 'भृंगराज कामेश्वर गुग्गुळ'.
आणि मग सहाजिकच आठवते ती दुक्कल व त्रिकूट व 'चौकुट' आँफ बबन प्रभू, व याकूब सईद, व आत्माराम भेंडे, व किशोर प्रधान!
या सर्वांनी रंगभूमीवर "रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून" आणि तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या दूरदर्शन वर "ट्या ण्या ण्या ण्या ण्या...नंतर" मनसोक्त धुमाकूळ घातला होता.
मग पूढे विनोदी बाजच बदलला...
असो.
आता एक वेगळाच विचार आलाय डोक्यात, हे लिहीता लिहीता. सिरीयसली. याच संदर्भात. डोंट नो हाऊ इट कँन n विल वर्क आऊट.
लेट मी गिव्ह इट अ थाँट...
---
मिलिंद काळे, 17th November 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment