Er Rational musings #182
साक्षात्कार
जिवाभावाचे सख्य असता सख्ख नात
केली दगा फितूरी अर्ध्यावर सोडला हात
मनाजोगी साथ जन्म जन्मांतरीची गाठ
विनाशकाले विपरीत बुध्दि फिरवली पाठ
आंधळे विश्लेषण मांडले अतर्क्य सुचले
ऐकले न ऐकल्यासारखे केले दुर्लक्ष झाले
घडू नये तेच घडले फितूर फासे उलटले
तेल गेले तुपही गेले हाती धुपाटणे आले
शब्दांच्या पलिकडले, रहस्य मज उलगडले...
---.
मिलिंद काळे, 11th November 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment