Monday, November 23, 2015

Er Rational musings #131

Er Rational musings #131



~ नावात काय आहे?



मुलांची नाव बहुतकरून "अ" ने संपतात. जसे मिलिंद, प्रकाश, विकास, संजय, मनन इ.



मुलींची नावे बहुतकरून "आ" किंवा "ई" ने संपतात. जसे भावना, प्रतिभा, जाई, संपदा, मालिनी इ.



काही नावे मुलांची व मुलींची, दोघांची असतात; उदाहरणार्थ नयन, सविता (होय सविता), शिरीष, किरण, कमल, माणिक, मृणाल, सुहास इ.



देवाशी निगडीत...काही वानगीदाखल...

~ पूजा, आरती, प्रसाद, अभिषेक, र्रुग्वेद, भक्ती इ.



पुल्लिंगी, स्त्रीलिंगी...काही वानगीदाखल...



मधूर, माधूरी, मधू, मधूरा, मधूवंती

आर्य, आर्या, आर्यन

विजय, विजया

निखिल, निखिला

प्रवीण, प्रवीणा

नील, अनील, नीला, नीलकंठ, सुनील, सुनीला

सुमित, मिता, अमिता, सुमिता

वसंत, वासंती

अदित, अदिती

भारत, भारती

अद्वैत, अद्वैता

ललीत, ललिता

किशोर, किशोरी

चेतन, चेतना

अक्षर, अक्षरा

जागृत, जागृती

हेमंत, हेमा, हेमलता, हेमांगी

अमृत, अमृता

चिन्मय, चिन्मयी

समीर, समीरा

आनंद, आनंदी

प्रफुल्ल, प्रफुल्ला

मोहन, मोहीनी

दिपल, दिपाली, दीपक, दीपा

अपूर्व, अपूर्वा, पूर्वा

चंद्रेश, चंद्रा, चंद्रशेखर

माधव, माधवी,

अरूण, अरूणा,

करूण, करूणा

निशित, निशा, निशिता

अश्विन, अश्विनी

जनक, जानकी

मयूर, मयूरी, मयूरेश

स्मित, स्मिता, अस्मिता

हर्षद, हर्षा, हर्षिल, हर्षदा

मानस, मानसी

जय, जया, जयंत, जयंती, अजय, जयवंत, जयवंती, जयेश, जयश्री

प्रभाकर, प्रभा

वरद, वरदा

स्वप्नील, स्वप्ना

मनीष, मनीषा

सुशील, सुशीला, शीला

उज्वल, उज्वला



~ A rose by any other name would smell as sweet - William Shakespeare

---

मिलिंद काळे, 23rd November 2015

No comments:

Post a Comment