Tuesday, November 17, 2015

Er Rational musings #119

Er Rational musings #119



~ सर्वच प्रश्न "सोडवून" सुटत नाहीत.

~ काही प्रश्न "सोडून" दिले की आपोआप सुटतात.



अरे काहीही काय सांगतोस. असे कसे सोडून देऊ? आणि का म्हणून? असं कसं विसरता येईल? हे शक्य आहे का? कायम मीच का कमीपणा घ्यायचा? म्हणजे सर्व करूनसवरून 'ते' मात्र नामानिराळे. + तुला सांगायला काय जातयं? ज्याचे जळते त्यालाच कळते. माघार नाही. दाखवतोच मी काय चीज आहे ते. एकदा केलं, पुन्हा करण्याची हिंमतच होणार नाही...



आणि ही पळवाट झाली...



एकात एक, एक, दोन, चार, आठ, सोळा, बत्तीस, चौसष्ठ,..चक्रवाढ वाढ नुसती...अंत आहे का?



+>↗↖↘↙⬆>>>🌑↕🔄🔄>>>>>>...



त्यापेक्षा ⏩⏩🆗🆒🆓🆕⏩⏩

---

मिलिंद काळे, 18th November 2015

No comments:

Post a Comment