Er Rational musings #85
अगगगगग विंचू चावला,
अगगगग गग विंचू चावला,
विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो।
तिनं एकहाती सक्ता आणा म्हंटली.... आणली !
तिनं मोदींची सद्दी आणा म्हंटली.... आणली !
तिनं भाजपा ची पकड आणा म्हंटली.... आणली !
तिनं स्वच्छ कारभारा ची अपेक्षा आणा म्हंटली.... आणली !
अहो दिल्ली दरबारी गडबड झाली,
माडीवरची मंडळी खाली आली,
आली आली हो महागाबाई,
आली आली हो महागाबाई !
महागाबाई बोलली हटून,
आणि विकायला बसली नटून,
तिथं स्वस्ताईचा पत्त्याच नाही,
आली आली हो महागाबाई !
महागाबाई निघाली जत्रंला,
दोनशे रुपयं बांधलं डाळीला,
तिथं साठेबाज आडवंच जाई,
आली आली हो महागाबाई !
महागाबाई पडली इरेला,
ह्यो व्यापारी नवरा ठरिवला,
त्याच्या तोंडाला लाजच नाही,
आली आली हो महागाबाई !
अशी आमुची महागाबाई शहाणी
तिच्या जल्माची झाली कहाणी
कडं पात्तूर एकलीच र्हाई
आली आली हो महागाबाई !
अगगगगग विंचू चावला,
अगगगग गग विंचू चावला,
काय बाई करू, कोणाला सांगू, काय मी करू,
विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो।
---
मिलिंद काळे, 7th November 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment