Er Rational musings #76
उपास करावा का? तर उत्तर होय असेच असणारय.
पण रूढार्थाने नव्हे. म्हणजे कायय की आपणच आपल्या देवांना संकुचित करून ठेवलय. प्रत्येकाला (त्यात पण महत्वाच्या, मोजक्या बर का!) सोमवारी शंकर, मंगळवारी गणपती, गुरुवारी दत्त/दत्ताचे अवतार, शनिवारी मारूती/हनुमानजी. बुधवार, शुक्रवार (काही प्रमाणात) व रविवार, तसे अजून रूढार्थाने अँलाँकेट केलेले नाहीयत!
मग रिस्पेक्टिव्ह भक्तजन त्या त्या दिवशी उपास (उपवास) करतात. त्यातही कस्टमायझेशन आहे. खाऊन पिऊन उपास (फक्त उपासाचे पौष्टिक! पदार्थ बर कां), एक वेळच जेवून उपास, सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर च पोटं भरपेट भरण्याचा अघोरी उपास, फक्त फळे खाऊन उपास, फक्त लिक्विडवाला उपास अँड सो आँन.
आठवड्यातून एक दिवस कंप्लीट 'लंघन' कराव, या मताचा मी आहे. पोटाला, पचनसंस्थेला आराम मिळाला पाहिजे नाही का?
आणि दूसरं म्हणजे, दिवसांचे अँलाँकेशन थांबवायला काय हरकत आहे? काळ बदलला. जमाना बदलला. रूतूचक्र बदलले. सिझन पूढे मागे सरकलेत. काल परवा पर्यंत उष्ण समजले जाणारे दिवस महिने पूढे मागे सरकलेत. त्यामूळे 'त्या' दिवसात कांदा खाऊ नये, या दिवसात लसूण खाऊ नये, त्या दिवशी फराळ करावा व त्यामूळं हे वर्ज्य ते खाऊ नये वगैरे सगळेच संदर्भ बदललेत.
काय खावं, किती खावं, कुठे कधी खावं - खावू नये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे - मान्य.
परंतु नाँर्मली, जनरली स्पिकींग, एखादा दिवस लंघन करायला कोणाचीच हरकत नसावी.
---
मिलिंद काळे, 2nd November 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment