Friday, November 13, 2015

Er Rational musings #108

Er Rational musings #108



पूण्याची म्हणून स्वत:ची काही वैशिष्ट्यं आहेत.



असं म्हणायचाच अवकाश, प्रत्येकाच्या डोक्यात, डोळ्यांसमोर, मनात, दोनशे तीनशे तरी घटना, प्रसंग फ्लँश होत असणार. पूण्या बाहेरील लोक्स, विशेषत: मुंबईकरांना तर आनंदाच्या उकळ्याच फुटतात. तुच्छतेचे आविर्भाव आपसूकच येतात.



पूणे 30!! एम एच 12!!



भारी (लय भारी नव्हे). एक नंबर. काय मँन आहे. बस का राव. हे टिपिकल पूणेरी शब्द.



दूचाकी, चारचाकी चालवायला उत्तम ठिकाण. एकदमच सोप्प काम, (कारण सगळेच जण मूर्खासारखे चालवतात;) त्यामूळे तुम्ही कशीही गाडी चालवा, आपोआपच खपून जातं.



बरं, त्यात ते स्कार्फ. हे एक वेगळेच प्रकरण आहे. कसला ताम झाम असतो ना.



आणि अतिशय महत्वाचं म्हणजे, माणसे! तूम्ही एखादी घटना, प्रसंग, सांगायचाच अवकाश; यांच्या कडे तत्सम स्टोरी असलीच पाहीजे. ह्यांच्या कुणाच्या मित्रा बाबतीत किंवा ओळखीत किंवा नातेवाईकांत किंवा 'जवळच्या' ऐकिवात ते वा त्याच्यासारखं वा तसच काहिसं वा तिथेच कुठेतरी घडलेले असते. असतेच असते. तुमचं ऐकलं ना, आता ऐकाच, या बरहुकूम! ऐकाव, हो म्हणावं, प्रतिसाद द्यावा, सोडून द्याव कीनाई? पण नाही; यांच्याकडे तीन चार गोष्टी असतातच तशा!



पूणे तिथे काय उणे??!!

---

मिलिंद काळे, 13th November 2015

No comments:

Post a Comment