Wednesday, November 4, 2015

Er Rational musings #80

Er Rational musings #80



~ मासे विकायला 'जोडीने' का असतात? उदा. पापलेट जोडी वगैरे.

~ केळी डझना वारी का घेतात?

~ अडीच (च) किलो ने कांदे वा बटाटे का घेतात?

~ 'चवी' नुसार वा 'चवी' पुरतं मीठ (!) (व लाल तिखट) हे कुठलं माप आहे?

~ भाजी कोथिंबिर 'जूडी' ने का मिळते?

~ बऱ्याचशा सटर फटर गोष्टी वाट्याने का मिळतात. ह्या 'वाट्याचे' लाँजिक काय?

~ ऊसाचा रस अर्ध्या, फूल्ल व जंबो (!) ग्लासात मिळतो; हे जंबो प्रमाण कुठून आलं?

~ चणे शेंगदाणे चूरमुरे विकणाऱ्या कडे एक भलतच माप असतं. 2 रू, 5 रू वालं!

~ पाणी पूरी/शेवपूरी/शेव बटाटा पूरी/रगडा पूरी इ. प्लेट मध्ये पाच किंवा सहा च पूऱ्या का असतात? आठ का नसतात?

..व्हाइस व्हर्सा / आँन द काँट्ररी..

चिकन टिक्क्का/कुठलेही कबाब/व्हेज स्पिंग रोल वगैरे, प्लेट मध्ये सहा किंवा आठ पीस च का असतात? पाच का नसतात?

~ कटिंग चहा/वन बाय टू हे कुठून आलं? आता तर एक कटिंग व एक खाली (रिकामा) ग्लास असेही काही जणं मागायला लागलेत!



सर्वात महत्वाचं:-

कटिंग चहा च्या ग्लास चा साईज दिवसेंदिवस छोटा छोटा होत चाललाय - काही दिवसांनी पळी च्या आकाराचा नाही झाला, म्हणजे मिळवलं.

---

मिलिंद काळे, 4th November 2015

No comments:

Post a Comment