Friday, November 20, 2015

Er Rational musings #126

Er Rational musings #126



घाकुदाभा



स्टाँपींग एट घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा!



वर्षानूवर्ष ही चार स्थानकं रेल्वेने मेन मानली आहेत. त्यामुळे मुंबई च्या फास्ट लोकल गाड्या 75% ह्या स्टेशनांवर थांबतात.



मुलुंड ला थांबणाऱ्या फास्ट ट्रेन्स लिमिटेड. सकाळी एक दोन मुलुंडला थांबून माटुंग्यालाही थांबतात, ते माटुंगा परिसरातील काँलेजेसची संख्या बघून. संध्याकाळी पाच च्या सुमारास व्ही टी, साँरी, सी एस टी (अजूनही सी एस टी नाव अंगवळणी पडलेले नाहीये!) हून सुटणारी अंबरनाथ फास्ट प्रचंड फेमस आहे. दादर ठाणे डायरेक्ट, म्हणजे आत दरवाज्यात उजव्या बाजूला जाऊन उभे राहीले कि चिंता नाही गर्दीची, ठाणे उजवीकडेच येतं.



~ धावती गाडी पकडणे (तसेच उतरणेही) अत्यंत धोकादायक आहे. असे अनाऊन्स करत असतात.

आम्ही एक्सपर्ट आहोत, होतो.

~ गर्दीत गाडीत आत शिरून 'मोक्याची' जागा, मग ती व्ही टी ला गाडी पकडताना खिडकी असो किंवा मुलुंड ला गाडी पकडताना उभे राहायची जागा असो किंवा मधल्या कुठल्या स्टेशनावर गाडी पकडताना ची दारातली जागा असो, आम्ही एक्सपर्ट आहोत, होतो.

~ आयुष्यात एकदा का आपण सायकल चालवायला किंवा पाण्यात पोहायला शिकलो की विसरत नाही असं म्हणतात, ते खरेच आहे. हाच नियम माझ्यासारख्या डाय हार्ड मुंबईकराला लोकल ट्रेन्स बाबतीत तंतोतंत लागू पडतो.



आणि हो, "उलटा मत उतरो" असं आम्ही मुंबईकर "बाहेरून" आलेल्यांना कायम सांगतो.



~ गाडीतून उतरताना, मग ती लोकल ट्रेन असो, थ्रू ट्रेन मेल - एक्सप्रेस असो किंवा बस ही असो, कुठलेही वाहन असो, उतरताना वाहन ज्या दिशेला जातय तिथे तोंड करा. डावीकडून उतरताना डावा पाय पहिले बाहेर काढा - टेकवा. उजवीकडून उतरताना उजवा पाय पहिले बाहेर काढा - टेकवा. अश्या प्रकारे उतरलात तर उतरताना पडायची शक्यता प्रैक्टिकली झीरो आहे.



असो.

---

मिलिंद काळे, 21st November 2015

No comments:

Post a Comment