Er Rational musings #121
असे आहे म्हणून तसे आहे, आणि तसे आहे म्हणून असे आहे
~ तीव्र पाणी टंचाई आहे. पाणी जपून वापरण्याचा महापालिकेचा सल्ला. पाणी भरून ठेवायला लागतय. वाँश रूम(म्स) मध्ये, बेसिन जवळ, स्वयंपाकघराच्या सिंकवर वगैरे. बादल्यांमध्ये. पातेल्यांमध्ये. मग दूसरा धोका. डास ब्रिडींगला आमंत्रण. साचलेल्या साठवलेल्या पाण्यात डास तयार होतात. मलेरिया व डेंग्यू चा धोका. सांगा काय करायचं, कसं जगायचं?! इकडे आड तिकडे विहीर.
~ जड वाहने डावीकडून चालवायची असतात. ओव्हरटेक उजवीकडून करायचा असतो.. एक्सप्रेस-वे वर मधली लेन एका स्पीड ने क्रूझ करणाऱ्या हलक्या (लहान) गाड्यांसाठी असते तर उजवीकडची लेन ओव्हरटेक करणाऱ्या फास्ट गाड्यांसाठी मोकळी ठेवायची असते. हे असं प्रत्यक्षात असतं का? सांगा काय करायचं, कशी गाडी चालवायची?! इकडे आड तिकडे विहीर.
~ मोबाईल ही अत्यावश्यक गोष्ट झालीये. काँल ड्राँप प्राँब्लेम. घरी असताना रेंज मिळत नाही वगैरे वाढत्या तक्रारी. परंतु आपल्याला नेटवर्क, रेंज तर टकाटक पाहीजे. कुठून येणार? सँटेलाईट मार्गे प्रत्येक यूजर पर्यंत कायमच पोहोण्याचे तंत्र अजून विकसित व्हायचय. जादू नाहीये. नेटवर्क, रेंज मिळते ती मोबाईल टाँवर थ्रू. आता हे टाँवर उभारायला विरोध. किरणोत्सर्गाच्या धोक्यामुळे हे टाँवर आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवर नको, रस्त्यात नको, कोपऱ्यात नको, मध्यात नको, बागेत नको, नकोच नको. सांगा काय करायचं, कसं नेटवर्क द्यायचं?! इकडे आड तिकडे विहीर.
~ उघड्यावर प्रिपेअर केलेले खाद्यपदार्थ खाऊ नये. अन-हायजिनीक वगैरे. शिवाय कायद्यानेही बंदी. प्रत्यक्षात काय? सगळीकडे खाऊ गल्या. रेल्वे स्टेशन परिसर तर यांना आंगणच दिलेला. चारचाकी जाऊदे, दूचाकी पार्किंगलाही बंदी या परिसरात. फेरीवाले, खाद्यजत्रा मात्र मुबलक - सकाळी सात-आठ पासून ते रात्री एकच्या बेतापर्यंत खाऊ गल्या फुल्ल! सरकारी आशीर्वाद (!), वरदहस्त! व आपल्याच मूळे. सांगा काय करायचं, कसंं करायचं?! इकडे आड तिकडे विहीर.
---
मिलिंद काळे, 19th November 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment