Er Rational musings #78
रांधा, वाढा, उष्टी काढा...
स्त्री जन्मा तूझी कहाणी...
घरोघरी मातीच्या चूली...
या, व तत्सम म्हणी हद्दपार झाल्या आहेत, होत आहेत, ही अतिशय उत्तम बाब आहे. पण अजून खूप पल्ला गाठायचाय.
शहरी भागात थोडे (सेच) काम कमी आहे, ग्रामीण भागापेक्षा. असे म्हणणे थोडे धाडसाचे ठरावे, अशी परिस्थिति आहे.
'क्राईम पँट्रोल, सतर्क' (आधीचे नाव 'क्राईम पँट्रोल, दस्तक') नावाची एक नितांत सुंदर मालिका सोनी चँनेल वर असते, सत्य घटना - गुन्ह्यांवर आधारीत. ह्या वीकमध्ये, त्यात दाखवताहेत स्त्रीयांवरील अत्याचार, अगदी चिमूरडी ही नराधमांपासून सुटत नाहीये. अतिशय घृणास्पद, चीड आणणाऱ्या घटना. अशा गुन्हेगारांची सालडीच सोलायला पाहीजे.
बेटी बढाओ, बेटी पढाओ...
स्त्री भ्रूणहत्या थांबवा...
मुलगी शिकली, प्रगती झाली...
ह्या व ह्यासारख्याच म्हणी, जेव्हा सर्वार्थाने नसानसात भिनल्या जातील, तो सुदीन.
या नोबल काँज साठी आपण प्रत्येकाने जमेल तेवढे जमेल तसे जमेल त्याप्रकारे परंतु हवे तिथे गरज असेल तिथे, आपापल्यापरीने काँट्रीब्यूशन द्यायला पाहीजे, आपला खारीचा वाटा उचलला पाहीजे!
---
मिलिंद काळे, 3rd November 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment