Friday, November 27, 2015

Er Rational musings #139

Er Rational musings #139



आपण मोठे होतोय, वय वाढतय हे दोन गोष्टींमूळे ठळकपणे जाणवायला लागते. एक सुखद तर एक दु:खद.



दु:खद अशासाठी की आपले, आपल्या समवयीन मित्र मैत्रिणीं चे आई वडील आपल्याला सोडून जायला लागतात. तेव्हा.



सुखद अशासाठी की आपल्या, आपल्या समवयीन मित्र मैत्रिणीं च्या मुला मुलींची लग्ने व्हायला लागतात. तेव्हा.



अर्थातच हे वयाने प्रौढ होणं झालं. निसर्ग नियम. परंतु हीच योग्य वेळ आहे ती आत्मपरिक्षण करण्याची, थोडं मागे वळून पहाण्याची - अँनँलिसीस करण्याची, त्रयस्थ पणे चूका, उणीवा शोधण्याची, उर्वरीत आयुष्याचे आराखडे बनवण्याची, अनुभवांची शिदोरी उघडून आनंद वाटण्याची. आणि मनाने हिरवं होण्याची - अर्थात जरा जपून!!



एका अर्थी आपण भाग्यवान आहोत. अलगदपणे आपल्या हातात तंत्रद्न्यान पडलय. पुढची पिढी आपल्या बरोबर आहे. (फार कशाला; आपण पाहिलेले अनुभवलेले, पूर्वीचे कौंटुंबिक कलह - भाऊबंदकी, नात्यांतील ताणलेले संबंध वगैरे, आपल्या व आपल्या मुलांच्या बाबतीत व अवती भोवती फारच कमी जाणवतायत!) एकंदरीत बरं चाललाय! नक्कीच, हो की नाही?



तेव्हा, प्रारब्ध!, असं निर्बूध्दपणे म्हणून स्तब्ध नको नुसतं बसूया...



चला, बसूया 🍺🍺...

---

मिलिंद काळे, 27th November 2015

No comments:

Post a Comment