Er Rational musings #100
दिवाळी फराळ म्हणजे चिवडा, अशी माझी ठाम समजूत आहे!
जाँईंट फँमिली, पाव्हणे रावळे, आज्जी - आई - माया (व बाबांना!) या सगळ्यांना निरनिराळे पदार्थ बनवायची, स्वयंपाकाची प्रचंड आवड, आणि खाण्याची आवड असलेले आम्ही सारे, यामुळे दिवाळी फराळ म्हणजे एक अँन्यूअल इव्हेंट!
पोह्याचा चिवडा, रवा बेसन लाडू, चकली, शेव, गोड शंकरपाळ्या, तिखट शंकरपाळ्या, पाकातले चिरोटे, करंज्या, अनारसे, कडबोळी, गोड वड्या इ. मुबलक. सकाळी, संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र बसून, मध्यभागी डबे मांडून हादाडी!
परंतु माझ्या दृष्टीने दिवाळीचा फराळ म्हणजे चिवडा, चिवडा व चिवडा, इतर सर्व तोंडी लावायला!
नुसता हापसायचा!
तुमचा अनुभव, तुमचे मत काय?
---
मिलिंद काळे, 11th November 201
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment