Er Rational musings #75
कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नये असं म्हणतात. व्हॉट्सऍप चं अगदी असच आहे.
सकाळी झोपेतून जागे होताना आपसूकच उशाशी ठेवलेला मोबाइल उचलला जातो. पहिल्या प्रथम व्हॉट्सऍप. बोटं जी सराईत पणे फिरायला लागतात की ह्याचं नाव ते.
गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभप्रभात, शुभकामनाएं, सुविचार, सूर्य, पाने फूले निसर्ग, कोणाचा वाढदिवस, वेडिंग अँनिव्हर्सरी, लक्ष्मी सरस्वती गणपती बाप्पा श्री साईनाथ, एक ना अनेक, ठाण मांडून समोर स्क्रिन वर हजर. बरोबरीने, 7 जणांना 5(!) मिनिटात फाँरवर्ड करा व चमत्कार अनूभवा, असे दिव्य (!) मेसेज. हे चक्र दिवसभर सुरू असतं.
एखादी स्पेशल पोस्ट एका ग्रूपवर रिसीव्ह झाली, म्हणजे समजावं की पूढील तीन चार दिवस तरी वेगवेगळ्या ठिकाणांहून परत परत येणार. असो.
सांगायचा मुद्दा हा की आपल्याला व्यसन लागलंय.
आता त्यामुळे शीण जातो, मरगळ नाहीशी होते, ताजे तवाने वाटते, काही नवीन माहिती मिळते, कामाच्या रगाड्यातून थोडा विरंगुळा मिळतो, एकमेकांची आठवण होते - आठवणी जागावल्या जातात - घडलेले, घडून गेलेले काही प्रसंग, काही घटना डोळ्यांपूढे येतात, एकटेपणात आधार वाटतो, फोटो व्हिडियो बघताना मन भूतकाळात जाते - प्रसन्न होते, वगैरे वगैरे.
पण जरा जपून, मंडळी.
अती झालं अन् हसू आलं असं नको व्हायला!
पण मला प्रांजळपणे कबूल करायला काहीच कमीपणा वाटत नाही, की होय, मी व्हॉट्सऍपचा अँडिक्ट झालोय. सारखं सारखं मधून मधून वरचेवर (!!!) व्हॉट्सऍप बघीतल्या शिवाय मला राहवतच नाही - चैनच पडत नाही!
व्यसनी. व्यसनाधीन. व्यसनासक्त!
ओम् व्हॉट्सऍपायन् नम:।
ओम् श्री व्हॉट्सऍपाय सांगाय सपरिवार देवता भ्योन्म:।
इति श्री व्हॉट्सऍपायन् नम:।
---
मिलिंद काळे, 2nd November 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment