Wednesday, November 11, 2015

Er Rational musings #101

Er Rational musings #101



ज्यात त्यात वरून मीठ घालून खायची (व लिंबू पिळायची!) काही जणांना सवय असते. मी याच्या अगदी विरूध्द. प्रत्येक पदार्थ बनवताना आंबट तिखट मीठ योग्य प्रमाणात घातलेले असते, अशी माझी समजूत असल्या कारणाने, मी कधीच 'वरून' मीठ  घेत नाही व लिंबू पिळत नाही.



दोन तीन जवळच्या मित्रांची ही सवय मात्र मी घालवली आहे! कशी, ते सांगतो.



कुठेही बघा. काहीही पदार्थ असूदे. बहुतेक वेळा हे लोक्स, मग ते जेवणात असूदे, किंवा बाहेर खातानाच्या डिशेस असूदेत, हे आपले प्रत्येकावर चिमूट चिमूट मीठ शिंपडायचे - किंबहूना असं वरून मीठ ओतल्या (!) व लिंबू पिळल्या शिवाय अन्नच पोटात उतरायचं नाही, असों. मला ह्याची मनापासूनच चीड. मला हे लोक्स म्हणायचे अरे तूला कशाची चवच नाही. तू तर अळणी पण आनंदाने मिटक्या मारत खातोस! (ते एका अर्थी खरेच आहे म्हणा; आणि तसेही माझा कल तिखट - व त्यात तेलाचा तवंग असला तर अती उक्तम! असाच आहे).



मग मी काय करायला लागलो, की, मी यांच्या कडे जेवायला गेलो किंवा बाहेर गेलो तर लाल तिखट मागवायचो. मीठ जसं पानात वाढतात तसं माझ्या पानात लाल तिखट. लाल तिखट चिमूट चिमूट प्रत्येकात घालायचे! आर्ग्यूमेंट असे, की, पूर्वापार मीठ पानात वाढायची परंपरा का सुरू झाली? लिंबू सुध्दा. मग तिखटाला आपले पूर्वज का विसरले?!



अक्षरश:, खरेच सांगतो, हे असलं तिखट घालताना बघून बघून यांचे वरचे मीठ सुटले! इव्हन लिंबू पिळायची सवय पण कमी झालीयेे, हे ही नसे थोडके.



काय हे, बाय डिफाँल्ट ज्यात त्यात वरून मीठ व लिंबू; ओरिजिनल चव ठेवा, आस्वाद घ्या की लेको.



बघा तुम्हीपण...

---

मिलिंद काळे, 11th November 2015

No comments:

Post a Comment