Er Rational musings #83
नाग पंचमी
कवठे महाकाळ, नाग पकडणे, पूजा करणे, इत्यादी. Banned; cruelty to animals n all. अतिशय योग्य.
बैल गाडा शर्यत वगैरे. Banned; cruelty to animals n all. अतिशय योग्य.
दही हंडी
जीवघेणे थर, थरांवर थर, उत्सवाचे बाजारीकरण, लहानग्यांचा गैरवापर - धोकादायक वगैरे. Banned; निर्बंध. अतिशय योग्य.
गणपती बाप्पा उत्सव
सार्वजनिक गणेशोत्सवांची वाढती संख्या, कर्णकर्कश्श डिजे वगैरे. चिंता व्यक्त. चर्चा. काही निर्बंध. अतिशय योग्य.
दिवाळी
कानठळ्या बसवणारे फटाके, धोकादायक फटाके इत्यादी. Banned; अतिशय योग्य.
दसरा
शमीची पाने तोडू नका, पर्यावरणाची हानी, वनसंपत्तीचा ऱ्हास वगैरे. चर्चा. इको-फ्रेंडली इ. अतिशय योग्य.
आणि जवळपास सर्व सण, उत्सव, परंपरा, रूढी, चालीरिती/रीति-रिवाज, लोकभावना?!
चर्चा, आवाज, कोर्ट कचेरी, खटले, वटहुकूम, कंडिशनल परवानगी, तत्सम...
ग्रेट. किप इट अप. अभिनंदन.
पण,
पण जरा एक (एक) तरी शब्द (ब्र!)?
हजारो, लाखो कुर्बान्या (?), एकाच दिवशी. क्रूरता? नाही, प्रेम!
हजारो, लाखो आत्मक्लेश, रक्तबंबाळ छात्या, सार्वजनिक आक्रोश, धारधार हत्यारे परजून स्वत:लाच जखमा, एकाच दिवशी. क्रूरता? नाही, बंधूभाव!
आँलरेडी पंचवीस पावले पूढे आहेत त्यांना बोलण्याआधी, शंभर पावले पाठी असलेल्यांना सुधारा. ते दूरच, निदान जाहीरपणे कुठेतरी थोडातरी उल्लेख करायला, सुतोवाच करायला सुरूवात करायला हवी, ही अपेक्षा रास्त नाहीये का?
एक गाव एक गणपती जरूर डिमांड करूया पण त्याबरोबर एक गाव एक बळी चालेल का हा विचार करूया!!
---
मिलिंद काळे, 6th November 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment