Er Rational musings #120
पिंगा च्या नावानं शिमगा.
आगामी बाजीराव मस्तानी तूफान चालणार व पहिल्या दोन आठवड्यातच वीस पंचवीस कोटींची उड्डाणे करणार. हे सांगायला कोणत्याही ज्योतिष्याची गरज नाही. याचं कारण पिंगा हे गाणं व त्याला (दिलेली) मिळत असलेली आपसूक प्रसिद्धी, उत्सूकता, कुतूहल आणि चर्चा. हे एक उत्कृष्ट मार्केटिंग तंत्र आहे, हे आपण कधी ओळखणार?
सिनेमा बनवायला जेवढा खर्च येतो, तेव्हढाच, किंबहूना थोडा जास्तच, त्याच्या मार्केटिंग वर येतो, नव्हे केला जातो, करावाच लागतो. सोशल मिडीया मुळे हे तंत्र मंत्र एव्हढे केव्हढेतरी रुंदावलय. कक्षा, परीघ मोठ्ठा झालाय.
व्हॉट्सऍप वर सिनेमाच्या बाजूने पोस्ट सोडायची. फेसबूक वर लाईक/डिसलाईक पेज करायचं, त्यावर खऱ्या खोट्या लाईक्स, काँमेंट्स, शेअर चा पाऊस पाडायचा वगैरे वगैरे. व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. मग सुरू होते सर्वत्र चर्चा.
पारंपारिक तंत्र मंत्र आहेतच. जसे, पब्लिकली विरोध, मोर्चे, बंदीची मागणी, लिटिगेशन इ. इ.
हे चालू असताना मूव्ही रिलीज होते, आपण बघतो, मतं प्रदर्शित करतो, लोक्स बघतात व असं करता करता फिल्म बनवायला लागलेला खर्च दामदूपटीने वसूल होतो.
चित्रपटगृहातून दोन तीन आठवड्यातच तीन सात नऊ कोटी, बाकीचे डिजीटल हक्क वितरण वगैरे.
तीन चार पाच! आठवड्यांनंतर हा सिनेमा सापडतच नाही, कुठे लागलाय ते. गायब.
मग तोपर्यंत दूसरा पहिल्याची जागा घेतो. आपण पण नव्या जोमाने व्हॉट्सऍप पत्र वगैरे लिहायला, फाँरवर्ड करायला सरसावतो.
विरंगुळ्याचे चार क्षण...
---
मिलिंद काळे, 18th November 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment