Er Rational musings #643
7/8/9/12/18 आँगस्टला अजून पाच पाखरं उडणारेत भुर्रकरून. कदाचित, तशी, कायमचीच, मोस्टली!
एक चाललीये मास्टर्स इन ड्रग्ज अँन्ड रेग्युलेटरी अफेअर्स (whatever is that!!) करायला, मुंबईत बीफार्म करून.
दूसरी चाललीये मास्टर्स करायला, बायोटेक मध्ये इथे ग्रँज्यूएशन करून.
तिसरी चाललीये मास्टर्स इन कंन्स्ट्रक्शन मँनेजमेंट करायला.
चौथी चाललीये एमएस करायला, इथे बीई करून.
हे सगळेजणं अर्थातच यूएस आँफ ए ला.
पाचवा चाललाय जर्मनीला एमएस करायला.
गेल्या तेरा दहा, चार तीन वर्षांत, माझ्या मित्रमंडळींची मुलं ज्या संख्येने गेलीयेत ना उच्च शिक्षणासाठी विदेशी, ती खूप आहे.
अँन्ड द एक्सोडस गोज आँन एन आँन.
कक्षा रूंदावताहेत. ज्ञानात भर पडतीये. मोठे होताहेत. चांगलीच गोष्ट आहे. कौतुकास्पद. अभिनंदनास्पर. शाबासकी मिळवण्यागत.
[ही गोष्ट अाहे साधारणपणे चौतीसेक वर्षांपूर्वीची म्हणजे 81का 82 साालची. सनी जेकब नावाचा माझा ज्यू मित्र होता. माझ्या घराजवळच रहायचा. मुलुंड मध्ये त्याच्या वडिलांचे सायकलचे दूकान. खूप पूर्वीपासून ते कुटुंब रहायच मुलुंडला, अस्खलित मराठी, मराठी शाळा, महाराष्ट्रीयनच ते झाले होते. खाऊन पिऊन सूखी. थोडे सधनपणाकडेच झुकणारे लोक्स. सनीच्या वडिलांचा जन्म जेरूसलेम मधला. परिस्थितिमुळे कैक लाखो ज्यू जगभर पसरले होते. 82 साली सनीच्या वडिलांनी इस्रायल ला परतायचा निर्णय घेतला. इथली बनी बनायी दूनिया सोडून. आपले सायकल चे दूकान, त्यांच्या दूकानातच तेव्हा काम करणाऱ्या बाबू नावाच्या पोऱ्या कडे सोपवून (त्याला देऊन! टाकून!! आज बाबू सायकल मार्ट छान चाललय!!!) जेकब कुटुंब जेरूसलेम ला परत गेले. कशासाठी? राष्ट्रप्रेम?! राज्य निर्माण करण्यास हातभार लावण्यासाठी?! शून्यातून (परत) विश्व उभे करण्यासाठी?! वेडखूळ, नविवेकपणा का शुध्द गाढवपणा?!
आज सनी प्रचंड समाधानी आहे. आणि, आय एम शूअर, की जेकब परिवाराराला एकदाही चुकूनही पश्चाताप झाला असेल. परत मायभूमीला परतल्याचा] --- सत्य घटना.
गेल्या तेरा दहा, चार तीन वर्षांत, परदेशांत उडालेल्या पाखरांपैकी एकही (!) पक्षी (!) आज मुंबईत - भारतात सेटल झालेला नाहीये.
इथे काय आहे? आमच्या ज्ञानाचे चीज होणारे का? बजबजपूरी. भ्रष्टाचार. अडचणीअडी. पाय खेचणारे. मदत न करणारे. घाणेरडे राजकारण. गर्दी गोंगाट गलिच्छता. अडाणीपणा. अंधश्रध्दा. अटी. जाचक नियम. ब्रिटीशकालीन कायदे. बेरोजगारी. गरीबी. ट्रँफीक (!). पैसा, सुविधा सोयींच, सुबत्तेच काय? का, कशासाठी यायच?
अरे बाळांनो, इथे जन्म घेतलात ना तुम्ही. तुमचे बापजादा इथलेच. (मला माहितीये की हे कारण पूरेसं नाहीये या विद्वान पिढीला.) मायभूमी, इंडिया काँलिंन्ग! (इस्रायल शी तुलनाच मुळात कशी अप्रस्तुत आहे हे ही हे सांगतील.) भावना बिवना गेली तेल लावत, असेही काही जणांचे मत असेलही. याच सिस्टीम मध्ये हे मोठे होऊ शकले. इथेच तुम्ही शिकलात. इथेच तुमच्या बापाईनी खस्ता खाल्या ना? याच सिस्टीम मधल्या बँन्केनी तुम्हाला शैक्षणिक कर्ज दिलं; हे विसरता नये. हीचतर (सडलेली) सिस्टीम बदलायची आहे ना? या ना. चँलेंन्ज स्वीकारा की, पळताय कशापायी? भित्रे पळपूटे. आम्ही आहोत ना. आमची पिढी. लढतोय. प्रयत्न करतोय. हातभार लावा. स्टार्ट अ स्टार्ट अप. वा मेक इन इंडिया. एव्हढे शिकलाहात, रिटर्न. झगडूया, बदलूया. बी द चेंन्ज इटसेल्फ!
आणि, भौगोलिक दृष्टीकोनातून बघीतल तर भारता सारखा दूसरा देश प्रान्त नाही ओ अख्या जगात. ना एक्स्ट्रीम क्लायमेट. उन्हाळा हिवाळा पावसाळा तसा बऱ्यापैकी संतुलित. ना इथे एक्स्ट्रीम नँचरल कँलँमिटीज.
प्रचंड संधी आहे, अक्कल वापरली पाहीजे. सगळ (कायदेशीररित्या पण), चांगल्या अर्थाने, शक्य आहे इच्छा असेल तर मार्ग पण आहे.
या पोस्टमुळे एखाद तीन जरी पाखरं, पक्षी होऊन इथे मायग्रेट झाली, तरी मी कृत:कृत्य समजीन.
(इव्हन) स्काय इज (नाँट) द लिमिट...
---
Milind Kale, 29th July 2016
My website: www.milindkale.com
My blog: milindmkale.blogspot.in
Facebook id: milind kale
Happy reading..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment