Er Rational musings #624
अगदी अत्तापर्यंत लखपती म्हणजे अती श्रीमंत माणूस असं गणलं जायचं. करोडपती म्हणजे खूपच झालं. थोड्या जून्या चित्रपटात नाही का, हिराँईन ला किडनँप बिडन्यााप केलं की खंडणी मागीतलेली दाखवायचे की एक लाख वा फारफारतर पाच (!) लाख रूपयोंका इंतजा़म करो वगैरे.
लखपती सोडा, करोडपती म्हणजे देखील काहीच वाटेनासे झालेयना आता? अब्जाधीश म्हणजे थोड्डस जवळ पोचतो आपण गर्भश्रीमंतीच वर्णन करताना, नाही?
इंग्लिश पद्धतीत थाउजंड, मिलियन, बिलियन, ट्रिलियन, क्वाड्रिलियन अशा एक हजाराच्या पटीतील संख्यांनाच संज्ञा आहेत. भारतीय पद्धतीत दहाच्या सतराव्या घातापर्यंतचे अंक आहेत.
मला वाटतं, येणाऱ्या अकरा चौदा वर्षांत खर्वपती- निखर्वाधीश असले आदरबोल कानावर पडायला लागले, तर आश्चर्य वाटायला नको.
१०,००,००० दहा लाख
१,००,००,००० कोटी
१०,००,००,००० दहा कोटी
१००,००,००,००० अब्ज
१० चा १० वा घात खर्व (दश अब्ज)
१० चा ११ वा घात निखर्व
१२ व्या घाता पुढील पद्म, शंकु (नील), जलधी (दशनील), अंत्य, मध्य ते अगदी
१० च्या १७ वा घात परार्ध (शंख) पर्यंत जात नाही, पण पूढील शंभरेक वर्षांत तशी पाळी येईल बहुतेक.
आम्ही मात्र विचारच करतो, मोजतो मनात वा बोटांवर, अजूनही, की लाख म्हणजे पाच, दहा लाख म्हणजे सहा, अअअअब्ज म्हणजे सात शून्ये - एकावर!
आर्यभट्टानी शून्याचा शोघ लावून समस्त पृथ्वीवासियांना नवी "वाट" दाखवली, हेच खरं...
---
Milinnd Kale, 15th July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment