Er Rational musings #602
उठसुट सरसकट पोस्टी फाँरवर्ड करणाऱ्यांचे एक बरे असते. इधर का माल उधर, ऊधर का माल इधर.
कँनडा चे पंतप्रधान स्टीफन हार्पर बद्दलची जजजूनी पोस्ट असो वा आस्ट्रेलिया च्या पंतप्रधान ज्यूलीया गिलार्ड असो. यांच्या संबंधी जजजून्या पोस्टस्, आपापल्या भिंतींवर झळकवण्यात काय शहाणपण?
बाय द वे, Justin Trudeau व Malcolm Turnbull हे विद्यमान पंतप्रधान आहेत, कँनडा व आस्ट्रेलिया चे, अनुक्रमे!
बंगळूरू च्या एका हार्ट स्पेश्यालीस्ट ची पोस्ट, वा, बंगळूरूच्याच एका शिष्यवृत्ती देणार्या ट्रस्ट ची पोस्ट, वा कुठल्याश्या सेंटरची हार्ट सर्जरी शिवाय हृदयरोग बरे करण्याची पोस्ट, वा कायनीकाय...माझा एक मित्र याला गार्बेज म्हणतो. माझं म्हणणं एव्हढच आहे, की कृपया योग्य ती शहानिशा करूनच ही पोस्टमन गिरी करावी.
सोशल नेटवर्किंग हे माध्यम म्हणजे एक अस्ताव्यस्त पडलेले वायफाय आहे. फेसबूक व व्हाँट्सअँप चा वापर करता आला पाहीजे. ओपन प्लँटफाँर्म मिळालाय ना? स्व लिखित, स्व रचीत, स्व रेखीत, स्व अनुभव, स्व - स्व, आपले विचार, अनुभव, फोटो, चित्रे, कविता, लेख, समीक्षा, व्हिडियोज, खाद्ययात्रा, खेळजथा, गायनवादन कला, इत्यादि इत्यादि काहिही स्व-आविष्कार. या "स्व" मध्ये आपण, आपले कुटुंब, मित्र परिवार, हितचिंतक, ओळखीचे माळखीचे, नातेवाईक आलेच, कारण हे सगळे आपल्या "स्व" शी जोडलेले आहेत.
नसता कचरा नको...
---
Milinnd Kale, 6th July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment