Sunday, July 10, 2016

Er Rational musings #610

Er Rational musings #610



कल्याण रेल्वे स्थानक हे जगातलं अत्यंत, नव्हे पहिल्या नंबरचं बकाल स्टेशन आहे, या मताचा मी गेल्या 31 ते 33 वर्षांपासून आहे. आणि आजही त्या मतावर मी ठाम आहे. एक नंबर.



सहा नऊ वर्षात तरी मी मुलुंड हून पूण्याला रेल्वेने प्रवास केलेला नाहीये. स्पेसिफिकली. पाँईंट टू पाँईंट. वेल, अल्मोस्ट, शिवनेरी सुरू झाल्यापासून तर कमीच की. ठाणे वंदना ते स्वारगेट, व्हाया मुलुंड म्हाडा काँलनी. टू अँन्ड फ्रो. किंवा जर बरोबर कुणी असेल तर चारचाकी, संपला विषय.



दख:नची राणी ही 1986 च्या आसपासची माझी फेवरीट गाडी. तीला पूरक म्हणून प्रगती आली. मग आली इंद्रायणी, आता इंटरसिटी. त्याला पँरलल, ठाणे स्वारगेट 3 x 2 एशियाड, मग 2 x 2 एशियाड, ह्या देखील पुष्कळ प्रवासल्या. शिवनेरी ने सगळ्यांना बाद केलं, माझ्या दृष्टीने.



तर, आज चक्क, कल्याण हून पूण्याला इंद्रायणी पकडायचा योग आलाय, अपरिहार्हतेमुळे, अचानकपणे. विदाऊट रिझर्वेशन.



अस्सल बाँर्न मुंबईकर असूदे वा उपऱ्या, पण आता मुंबईचाच हार्ड कोअर बनलेला कोणी लोंढ्यासोंड्या असूदे, खिशातलं पाकीट 'मारल' - 'चोरीला गेलं' नाही, एकदापण, लोकलप्रवासात, असा एकपण नसावा! मी (!) ही त्याला अपवाद नाहीये. आडव्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या माझ्या पृथ्वीतलावरच्या अस्तित्वात, एकदा, व एकदाच (आत्ताआत्तापावेतो तरी -- शुभ बोल नाऱ्या!!), माझं पाकीट मारलं गेलं ते याच करदंट्या कल्याण प्लँटफाँर्मवर, महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये, अनारक्षित डब्यात, अलोट गर्दीतनं चढताना, 1984 साली!!!



वालचंद इंजिनियरिंग काँलेज, सांगलीचे पत्र घरी उशीरा पोचलेले, सौजन्य अर्थातच आपले डाक खाते. बुलावा दूसऱ्या दिवशी पोस्टइंजिनियरिंग ला अँडमिशन; सांगलीत या, पैसे भरा म्हणून! तेव्हा कुठलं, तात्काळ, प्रिमियम तात्काळ. मग, आलचं, महालक्ष्मी कल्याणहून पकडायची वेळ आली. कल्याणला हह्या गर्दीत चढताना, 'हात की सफाई' झालीच. रात्र भर उभ्याने प्रवास, कसेबसे कधीतरी पहाटे लक्षात आले, अरे पाकीट गुल्ल! मागच्या खिशात ठेवलेले. तिकीटासकट. मग, सांगलीला उतरून, टिसी ती नजर चुकवुन मागच्या रूळांवरून कलटी - मामाच्या घरी, डायरेक्ट.



बकालपणा बरोबरीने, कल्याण बद्दल, ही ही एक अढी मनात, कायमची कोरलेली. नाठवण.



याअशा कल्याण रेल्वे प्लँटफाँर्मवर 25 तास, आठ दिवस, 13 महिने, फुकटेनाकटे, भिकारीआबालवृध्द, मळकट्कळकट्ट लोक्स वास्तव्य करत असावेत, अशी सद्यस्थिती नाहीच, असे म्हणता येणार नाही.



कल्याण असो...

---

Milinnd Kale, 10th July 2016

No comments:

Post a Comment