Tuesday, July 12, 2016

Er Rational musings #619

Er Rational musings #619



(एक) स्वगत मनोगत...



51. एक्कावन्न. पन्नास अधिक 'एक'. सरलं.



या 'अधिक' एका ला अनन्य साधारण महत्व आहे. आपल्यात. आपल्याकडे परंपराच आहे ना, अकरा, एकवीस, एक्कावन्न, एकशे एक, दोनशे एक्कावन्न वगैरेंची! शुभ लाभ.



हा 'प्लस वन', म्हणजे अक्कलदाढ असावी. आयुष्याची. सगळी दंतपंक्ती आल्याशेवटी जो दात येतो, दाढ येते, ती अक्कलदाढ. अगदी तसच; भूतल अस्तित्वाचा सुवर्ण महोत्सव साजरा केल्यनंतरच येणारं गेलेलं हे वर्ष, हे अक्कलेशी संबंधित असावं.



हे अक्कलवर्ष असल्याने, भल्या बूऱ्याचा परामर्श घेतला जावा. पुंजावळीची बेरीज भागाकारी समजूनउमजून घ्यावी. निसर्ग नियमानुसार एकाच झाडावर, एकाच फांदीवर वाढलेल्या वाढणाऱ्या पिकलेल्या पानांना नाजूकपणे खंबीर हातांनी आधार द्यावा, सावली द्यावी. स्व त्रूटींना समजून दूर करण्याचा यत्न करावा. नकळत पूढ्यात उभा ठाकणारा अंधार मोकळेपणे स्वीकारावा. नवीन उजेडाचे मुक्त कंठाने, सढळ हाताने स्वागत करावे.



हे नक्कीच शिकायच वर्ष. शिकवणारं वर्ष.



इंटर्व्हल नंतर पडदा परत उघडतो. उत्तरार्ध, पूर्वार्धापेक्षा अधिक (एक) रोमांचक, उत्कंठावर्धक, प्रशंसात्मक, उदाहरण धोरणात्मक असणारे. खऱ्या, चांगल्या अर्थाने अकलेने तारे तोडण्याचे वर्ष. आयसिंग आँन द केक.



बावन्नाव लागलं! स्वागत. श्री गजानन महाराजांच्या बावन्नी च्या मुखोद्गत मंत्रघोषात सद्भावनेनी, कृतज्ञता व्यक्त करत.



वेलकम टू द फ्यूचर...

---

Milinnd Kale, 13th July 2016

No comments:

Post a Comment