Er Rational musings #630
आपल्या बाह्यरूपांतील, म्हणजे एकंदरीत लूक्स, आणि पेहरावांतील बदल फारच इंटरेस्टिंग व मजेशीर असताते.
अगदी नखशिखांत. स्त्रीयांंच्या केशरचना, रिबीनी, रबरं चाप, ते थोबाड, साँरी चेहरा रंगवण्याचे प्रकार - यांत आय ब्रो (काजळ नव्हे, श्शी, असं म्हणताले हल्लीच्या यौवना!), ते लिप स्टीक ते कानातल गळ्यातल, नाकातलं(!), ते नेल पाँलिश, ते अगदी हातातलं, पायातल, पादत्राणं इत्यादि. ते सर्व आलं;
मुलांचं त्या मानाने बरय. केसांचा कोंबडा(!), एक विजार, एक बूश्शर्ट, पट्टा बूटचपला घड्याळ. या इतक्याच गोष्टींमध्ये खेळायचं!
दरेक 12 वर्षांनी आमूलाग्र बदल घडतो, असं एक अनुमान आहे.
हेच बघा ना; दोनच उदाहरणं घ्या. पूष्कळेत.
फूल्ल प्यांन्टीच्या आत एक चट्टेरी पट्टेरी हाफ चड्डी घालायचे पूर्वी लोक्स. ह्या चट्टेरी पट्टेरी चड्ड्या म्हणजे हल्लीच्या बाँक्सर, "चेक्स" च्या पँटी! इन व्होग, ट्रेंन्डींग! हाफ पँन्ट घालून लोक्स सहसा बाहेर पडत नसत. बर, स्लिपर्स (सपाता) घालून घराबाहेर पडले लोक्स, की नाकं मुरडायचे बरेचजणं मोठे लोक, म्हणायचे गावंढळ. आता मुलं सर्रास हाफ चड्या बरम्युडा व स्लिपर्स च प्रिफर करताते.
काँलेज कन्यका साड्या घालायच्या, हा फार पाठचा काळ झाला, आपल्या आया मावश्या आत्यांच्या वेळचा. अगदी हल्ली हल्ली पर्यंत पंजाबी ड्रेस हा एक च ड्रेस कोड असावा मुलींचा, जनरली, रोजचा. सुटसुटीत, अंग झाकणारा, विथ ओढणी. सलवारीत थोडे बदल असायचे, पण एकूणच टिपीकलता. चेंन्ज म्हणून जीन्स प्यांन्टी वापरात यायच्या मुलींच्या. (आत्ताच्या पिढीला हे थोडं आँड वाटेल!) पावसाळ्यात हमखास हे गोणपाट (जीन्स पँन्टी) वापरात यायचे अग्रक्रमाने, पंजाबी पेक्षा. आता बरोब्बर उलट चित्र दिसतं, म्हणजे जीन्स दररोज व चेंन्ज म्हणून पंजाबी!
गंमतीशीर अँम्यूझींग.
जरा विचारांती असे लक्षात येतं की हे सगळे बदल कालानुरूप, अनिवार्य आहेत. आणि चांगलेच आहेत. सोय महत्वाची. काळगरज. अँक्च्यूअली सवलत.
आणि म्हणतातच ना, आजची सवलत हा उद्याचा कायदा...
---
Milinnd Kale, 21st July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment