Er Rational musings #629
~ आँलफ्रेड हिचकाँक व सुभाष घई हे दोन दिग्गज नावाजलेले दिग्दर्शक; एक विलायती व दूसरा देशी. दोघे दोन धृवांवर, एकदम वेगळ्या धाटणीचे सिनेमे दिले दोघांनी, पण सूपर डूपर हिट. एकजण रहस्यपटांचा बादशहा तर दूसरा टिपीकल कमर्शियलपटांचा! दोघांचा काळही वेगळा, चाळीसेक वर्षांंची गँप.
पण दोघांत एक साम्य; विलक्षण वेगळं.
ते म्हणजे, आपल्या प्रत्येक चित्रपटात हे दोघेही दोनच मिनिटे का होईना, दर्शन देणार; नव्हे त्यांचा तसा आग्रहच असायचा. अ ट्रेडमार्क!
हिचकाँक: बस मधे चढताना, वा जस्ट कुठनतरी बँकग्राऊंडला पास होताना..
सुभाष घई: टोपी बिपी घालून ओझरता चेहरा..
हिचकाँक: द लेडी व्हँनिशेस् मधला ट्रेन मधला प्रवासी...(उदाहरणार्थ)
सुभाष घई: डिंन्ग डाँन्गssसिंग साँन्ग ओ बेबी सिंन्ग साँन्गss गाण्यात ओझरता दोनच बोल गाताना दिसणारा...(उदाहरणार्थ)
~ क्लिंन्ट ईस्टवूड व फिरोझ खान हे दोन दिग्गज (क्लिंन्ट ईस्टवूड नक्कीच दिग्गज, फिरोझ खान वोक्के). एक विलायती व दूसरा देशी. दोघे तसे दोन धृवांवर, पण सिनेमे सगळे सूपर डूपर हिट.
दोघांत एक साम्य; विलक्षण वेगळं. काऊ बाँयज्. क्लिंट ईस्टवूड हा "द मँन विथ नो नेम व डर्टी हँरी" आणि "जा़ँबाज" फिरोझ खानाची "कुर्बानी".
~ मेरिलीन मन्रो व मधुबाला ह्या दोन दिग्गज नावाजलेल्या अभिनेत्री; एक विलायती व दूसरी देशी. सगळे सिनेमे या दोघींचे सूपर डूपर हिट. दोघींमध्ये साम्य, ते म्हणजे, दोघीही प्रचंड गरीबीतन वर आलेल्या. महत्वाचं म्हणजे यांच्या सौंन्दर्याने सगळ्यांनाच मोहिनी घातली. भूरळ. व थ्थोडी अश्लिलतेकडे 'न' झुकणारी मादकता. आणिकेक विशेष समानता. दोघींच्या कपाळावरची डोळ्यांवर भूवयांवर लवणारी केसांची अल्लड बट! अ ट्रेडमार्क! (फूंकर मारावी वा एका बोटाने हळूवारपणे गुंफावी!!)
हाँली-बाँली वूड, हम साथ साथ हैं...
---
Milinnd Kale, 20th July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment