Sunday, July 17, 2016

Er Rational musings #626

Er Rational musings #626



~ जेव मुकाट्याने...

~ चूपचाप गीळ...

~ गपगुमान खा की...



यातला बाह्य-चीडभाव सोडा, पण ह्या शब्दांच्या अंतरंगात काही निराळच दडलय. शीतल समभाव. मतितार्थ एकच.



नीटस अर्थ आहे, न बोलता खाणे. याला वैज्ञानिक आधार आहे. शरीरशास्रानुसार, जल घन अन्न प्राशन क्रियेत तोंड, घसा, अन्ननलिका, व पूढे जठरं, आतडं इ अवयव ते अगदी उत्सर्जित मार्ग, या प्रक्रियेत स्वरनिर्मित इंद्रियांची लूडबूड घुसखोरी आडकाठी आणते. तोंडात घास असताना, खाताना, बोलू नये, अन्यथा अपचनास वाव असतो असे म्हणतात ते याचसाठी.



वेल, एकट्याने खाताना!



पूढे थिअरी आली, बिझिनेस लंच डिनर ची. म्हणजे पूढ्यातलं अन्न चिवडत डिस्कशन वगैरे! अर्थातच यांत अन्नआवड, अन्नगरज कमी व बिझिनेस विथ प्लेजरपणा जास्त.



घरोघरी, चार टाळकी, रात्रीच्या जेवणालाच (मोस्टली-ओह, सपोज्ड टू बी) एकत्र असतात. म्हणून गप्पा मारत जेवणाची गरज बनली.



कामाच्या ठिकाणी एकत्र कँन्टीनमध्ये वा आपापले डबे, गप्पाचर्चेत खाण्यात तर थोडी अपरिहार्हता, थोडी मजा, व थोडा फायदा, बरेचदा.



मला मात्र गपचीप, मान खाली घालून जेवायला आवडते. मला विविध खाणं पिणं प्रचंड आवडतं. कुठेही, कसेही, काहीही. त्यात व्यत्यय नको. अगदी मोबाईल चा ही.



गप्पाटप्पा व चर्चा ह्या काहीतरी (का ही ही) पिताना "तोंडी लावायच्या असतात' असं माझं स्पष्ट मत आहे. चायपे चर्चा वा काँफी विथ xxxxxx, आँर अँक्राँस द टेबल च्या दारू बारगप्पा!



माझे दोन्ही मोबाईल चक्क बंद(!) करून, वा कधीक्वचित सायलेंट ठेवून, मान खाली घालून, शर्टाच्या बाह्या फोल्ड करून, प्रसंगी डोळे मिटून व हातवाऱ्यानी अँप्रिशिएट करत, तोंडाने फक्त व्व्वा, वा श्श्य्या वा आxxxx काय जेवण आहे, वा च्याxx x, वा आईशप्पथ, वा मस्त्त सूपर्र्ब, टू गूड वा लव्हली फँन्टास्टीक वगैरे काहीतरी कौतूकाचे बोल 'तोंडी' लावत मी खातो.



न बोलता खाण्यामुळे अन्नकण बाहेर उडत नाहीत, चित्रविचित्र आवाज कानी पडत नाहीत. चांगलं पचतं सगळं. आल्हाळ पल्हाळ वेळ्हाल् काही न लावता.



आणिक, मोबाईल एकअर्धा तास बंद म्हणून जगबूडी काही होत नाही, माझ्याबाबतीत बोलायचं झालं तर, नाहीच नाही.



म्हणूनच, ह्या 99 कुळी कोब्राचा आग्रहच आहे, आमंत्रणच आहे;



या 'शातपणे' जेवायला...

---

Milinnd Kale, 18th July 2016

No comments:

Post a Comment