Saturday, July 30, 2016

Er Rational musings #642

Er Rational musings #642



ही आहेत मुलुंड मधली वर्षादृष्ये!



कशाला पाहीजे ओ खोपोली वा खंडाळा,

बेचिराखेकुंद हजर इथेच ह्ह्यो बदाबदा पावसाळा

अहो आमुच्या मायाबाई अतीच सुगरण

करती खेकडा भजी व चहा वाफाळा उकाळा



खरेच आहे. या पावसालाही माहीत पडलय, म्हणोनी दर शनिवार रविवारी बरसतोय. आभाळच फाटतय इथे अक्षरशः



आता अंधार घर झालय. मध्येच सोसाटवारा झाडेफांद्या गदागदा घूसळून गेला. मस्तपैकी चहाचा आस्वाद, आवडत्या बाल्कनीतनं. सकाळी नेहमीच कावळे, चिमण्या, कबुतरांबरोबर कोकीळा, खारी व पोपट यांचेही बागडणे चालू असते, डोळ्यांसमोर, हाताच्या अंतरावर असलेल्या आंबा, सुरू, नारळाच्या झाडांवर. या मुसळधार वृष्टीत चिडीचूप झालीये आत्ता. अंधारून पण आलय.



आता पंखा फूल्ल करायचा, पांघरूण घ्यायच ओढून, व बिछान्यावर ताणून द्यायचं, असा बेत आहे. समोर टिव्हीच्या रिमोटवर टाइपिंग करावच लागेल थोडावेळ; चांगला चित्रपट शोधायला, व मिळाला की मध्ये मध्ये जाहिरातींमध्ये.



चला, पत्राव सुशेगात...

---

Milind Kale, 31st July 2016

No comments:

Post a Comment