Thursday, July 28, 2016

Er Rational musings #640

Er Rational musings #640



पुढची जोरदार सर 10.30 वाजता. मग मुसळधार सव्वा तासभर. म्हणजे आमची निघण्याची वेळ. मग परत साधारण पणे 12.30 वाजता. आर्यन ची शाळा सुटण्याची वेळ, भर पावसात.



हे असच होतय. या पावसाला उमजल्या आहेत, समजल्यात आमच्या बाहेर पडण्याच्या वेळा.



नाही, नाही, मी काही आपलं हवामानखातं जाँईन नाही केलय. अनुभवाचे बोल.



पहाटे शांत असलेला पर्ज्यनराजा सकाळी पावणेसाताला जागा होतो. शाळेत निघालेल्यांना शिंबचिंब भिजवतो. तासदीडतासाने शांत, जसं काही काम संपवून हुश्श म्हणतो ना तसं.

पावणेसात, साडेदहा, साडेबारा, साडेदोन, व नंतर एकदम पावणेसातला, बरोब्बर हा अक्राळ रूप धारण करतो. मुलुंडात.



आत्ता पाऊस साहेब शांत आहेत जरा. 10.30 चा वेळ, नव्हे संततधार लेक्चर, बंन्क करणार बहुतेक आज.



मटा व टाईम्स आँफ इंडिया च्या मोबाईल अँप ने आत्ताच मला सूचित केलय की रेल्वेच्या तिनही मार्गावरील वाहतूक विस्कळीत. रस्त्यारस्त्यांवर पाणी. खोळंबा.



आज वर्क फ्राँम होम...

---

Milind Kale, 29th July 2016

No comments:

Post a Comment