Saturday, July 2, 2016

Er Rational musings #600

Er Rational musings #600



"रामकुंज, पोलिस लाईन समोर, मुलुंड"



एव्हढासाच संदिग्ध पत्यावर पोस्टाची पत्रे यायची, आमच्याकडे, अगदी आत्ताआत्तापावेतो. मुलुंडातले एक लँन्ड मार्कच जणू!



आपला जन्म कोणापोटी होणारे वगैरे आपल्या हातात नसते, तसेच, कोणत्या गावात जन्मायचे हेही नसते. मुलुंड (पूर्वीचे मुळुंद!) हे माझे जन्मगाव. सध्याचं वर्ष 2016; ह्या वर्षी आम्हा "काळे" मंडळी व मुलुंड च नातं 80 वर्षांचे झाले. सहस्त्रचंद्र दर्शनी सोहळा!



1946 साली माझ्या आजोबांनी इथे मुलुंडात प्लाँट घेतला, बांधकाम सुरू झाले, व अण्णा आज्जी 1948 रोजी मुलुंडाचे निवासी झाले. पोलिस स्टेशनच्या सान्निध्यात, पोलिस क्वार्टर (पोलिस लाईन) समोर, चे तीन प्लाँटस् तेव्हा या तीन मित्रांनी (तिघेही ब्राह्मण, पण त्यांत एक गुजराती), स्वत: वास्तू उभारल्या. याच्या पूढे जंगल होतं, मुळुंद संपायचे इथे, हे आजचे मुलुंड बघीतले तर पटणारही नाही. आज आमची चौथी पिढी सज्ञान झालीये इथेच. आद्य जन्मजात पिढीजात नखशिखांत मुलुंडकर आम्ही!!



मुलुंडबद्दल काय बोलावं? जन्मगाव म्हणून नव्हे, तसेही त्रयस्थ नजरेने बघीतले तरीही, मुलुंड इज मुलुंड इज मुलुंड; किंग आँफ सबर्बज्. अनडाऊटेडली. त्रिवार सत्य.



ब्रिटीशकालीन "क्राऊन व कार्टर" या नगर रचनाकारांनी घडवलेलं, पहिलं वहिलं प्लँन्ड सबर्ब, 1922 सालच. पर्फेक्ट आयताकृतीतील वा चौकोनातील रस्ते असो, वा ड्रेनेजची व्यवस्था असो, वा अगदी स्मशानभूमी असो, वा पाण्याचे वीजेचे वितरण असो; मुलुंड ग्रामपंचायत, ते महानगरपालिका यांनी आपापल्यापरीने, कुवतेनुसार, जमेल तेव्हढे यत्न केलेच आहेत, करताहेत.



कालच्याच पेपरात आलय, की मुंबई मधील सर्वाधिक झाडे असण्यात, उपनगरांत, मुलुंडचा पहिल्या तिघात समावेश आहे. व्वा! मुलुंड ला राहणं हा माझ्या स्वत:साठी अत्यंत सुखावह वास्तव वास्तव्य आहे. निगेटीव्ह गोष्टी थोड्या बाजूला ठेवू.



फेरीवाल्यांचे, खाद्यसंस्कृती, दूकानांचे रस्ते फूटपाथवरचे अनधिकृत आक्रमण कबजा बाजूला ठेवू. आजही, रस्ते फूटपाथ छानसे मोठे आहेत - रात्री एक वाजता वा पहाटे चार वाजता बघा!



प्रचंड गर्दी, तुडूंब अद्वातद्वा वाहनं, आडनिडं पार्कींग, रिक्शावाल्यांची मनमानी, फेरीवाल्यांची दादागिरी, पायाभूत सुविधांवरील तणावताण, आस्थापनातील लोकांचा उर्मटपणा, परिसरांतील अस्वच्छता, रस्त्यांची चाळण, पाणीतुंब एरियाज, बेशिस्त इग्नोरंट बेपर्वा सामान्यजन....भिकाऱ्यांचा उपद्रव, बास्स बास...



तरीही, अजूनही, बऱ्यापैकी मुबलक पाणी, साडे तेवीस पावणे चोवीस तास वीज, पंधराएक मोकळ्या जागा बागा, अद्ययावत इस्पितळं, सार्वजनिक बस सेवेमुळे मुंबई नवीमुंबई ठाणे इ ठिकाणी थेट पोहोचण्याची सुविधा, नाट्य चित्रपटगृहं, ..नावाजलेली काँलेजेस शाळा, बर्रेच काही...



धीस इज 'माय' मुलुंड.



एैशी वर्षांपासूनच ट्रान्सफाँर्मेशन अनुभवलेल्या, बदलांचा आँखोदेखा साक्षीदार असलेल्या, कळतनकळत मोठाछोटा हातभार लागलेल्या, एका आद्य मुलुंडकर कुटुंबाचं प्रातिनिधीकत्व मनोगत हितगुज.



ये फेवीकाँल का मज़बूत जोड हैं, टूटेगा नहीं।



निमित्तमात्र सहस्त्रचंद्रदर्शने स्वागतोत्सुक...

---

Milinnd Kale, 2nd July 2016

No comments:

Post a Comment