Tuesday, July 12, 2016

Er Rational musings #618

Er Rational musings #618



"फिजीकली, मेंटली फिट पाहीजे बाबा. असले हाल बघवत नाहीत." माझा मित्र.



मी: "अरे, पूढे काय होईल, कोणालाच ज्ञात नसते रे. आणि अशी वेळ कोणावर कधी सांगून येते का?"



"स्साला, या लाइफस्टाईलचेच लफडे आहे बघ. नुसती पळापळधावपळ. टेंन्शन्स टार्गेट्स. काळजी. धकधक. कमी झोप. अवेळीवेळी पिण-खाणं. आरबटचरबट. अन-हायजिनिक. तेलकटतुपकटतळलेलं. ड्रिंक्स. शरीराला व्यायाम पण नाही." तो डाफरला व सुटलाच जणू.



माझं स्वगत: वेळ; वेळ नाही. हा परवलीचा शब्द रूजलाय.



माझ्या आज्जीने याचा रामबाण इलाज सुचवला असता, आज ती असती तर, असं मला कायमच वाटतं.



आमच्या आज्जीचे प्रेमळ बोल: "रात्री कसल्या नसल्या मँचेस बघत बसता. नको तिथे उंडारणं. कुठेही काहीही कधीही खाणं. येण्याजाण्याच्या नको त्या वेळा.."



परंतू, या सगळ्या व्याप्तव्याधींना व्यापायचा, तारायचा, तो आज्जीबाईचा बटवा. याशिवाय, ती तीन(च) गोष्टी सांगायची.



~सकाळी (पहाटे नव्हे) लवकर उठणे. सिंम्पल. = दररोज. अँटलीस्ट, एक वेळ ठरवा व दररोज तेव्हाच उठा.



~ 21 सूर्य नमस्कार, 21 जोर, 21 बैठका. सिंम्पल. = दररोज.



~ 2 पोळ्या, भाजी, आमटी, भात. दोन वेळच जेवण. सिंम्पल. = शक्यतो दररोज. नाहीच जमले, तर अँटलीस्ट जमेल तेव्हा. मग या दोन जेवणांच्या मध्ये, आधी नंतर, काहीही चरा, भक्ष अभक्ष. उघड्यावरचे. नो प्राँब्लेम.



लिव्हींग कला नको वा आणायाम नको का वळवळकर जिम नको का बूंझा डांन्स नको, का दत्तविद्या नको, कायबी नगं. (जर काही असले केलत, तर पूरकच आहे, पण कंम्पल्शन नाही, व गरज त्याहून नाही!)



तूच तूझ्या जिवनाचा शिल्पकार.



लाख द़ूखोंकी एक द़वा हैं, क्यूँ ना आजमाये...

---

Milinnd Kale, 12th July 2016

No comments:

Post a Comment