Sunday, July 10, 2016

Er Rational musings #612

Er Rational musings #612



खंडाळा घाटावर माझे विशेष प्रेम आहे.



ओरिजिनल खंडाळा घाट, (हल्लीचा एक्सप्रेस घाट नाही!) आम्ही कैक वेळा चालत चढलाय. का? तर, किडे केवळ.



तेव्हा, आमच्यासाठी घाट सेक्शन सुरू व्हायचा हाँटेल रमाकांत, खोपोली पासनं, व संपायचा, लोणावळा एसटी स्टँड सर्कलशी. हे नसतेउपद्व्याप म्हणजे आमच्या 1979 व 1980 मधल्या सायकल सफाऱ्या. मुलुंड ते पूणे, 12 तास सायकलींग.. त्यातले तीन, (होय, तीन!) तास, खोपोली ते लोणावळा, खरी चढण, हातांत सायकल धरून चालत पार करण्यात जायचे. जमेल तेव्हढे पायडल मारत मारत. काही वेळेस अवजड वाहना (ट्रक) पाठची चेन धरून, त्यासोबत खेचले जात जात. पण बहुतेक सगळा घाट अक्षरशः चालत चालत, थांबत थांबत, पाणी पीत, सिगरेट ओढत, आम्ही पार करायचो. वेळ तीन तास. काय मजा होती.



नंतर काही वेळेस बजाज स्कूटर वरून. नंतर बऱ्याच वेळेस हिरो होंडा मोटर सायकल वरून. व आता खूपच वेळा चारचाकी वरून. खंडाळा घाटाशी नातचं जोडले गेलेय.



आणि हल्ली तीन तासात आरामात मुलुंड पूणे मी गाडीवर पार करतो.



पण 'त्या' तीन तासांची दरखेपेस आठवण येतेच येते.



वह भी क्या दिन थे यारों...

---

Milinnd Kale, 10th July 2016

No comments:

Post a Comment