Er Rational musings #628
नर्मदा परिक्रमा म्हणजे काय?
माहीत नव्हतं. टोटल किती किलोमीटर? किती चालणं दररोज? काय काय घेऊन जायचं? काय खायचं? काय प्यायचं? कुठे रहायचं? कुठे झोपायचं? कसं काय प्रातर्विधी वगैरे?किती कपडे? ऊन, थंडी, वारा पाऊस - कसं काय रक्षण करायचं स्वत:चं? आजारपण? चोरी - लुबाडणं? हिंस्र जंगली प्राणी? जंगल, डोंगर, दऱ्या? कुठून सुरू करायची? कुठे संपवायची? केव्हढे प्रश्न, शंका.
सर्वात महत्वाचा प्रश्न, नर्मदा परिक्रमा "का" करायची आणि सर्वात महत्वाची शंका, "काही वाईट बरं घडल तर?"
मुलुंड पश्चिमेला माझ्या घराच्या पूढे तीन मिनिटांवर नर्मदा देवीचे मंदीर आहे. नर्मदा देवी म्हणजे मुळुंद गावाची गावदेवी (ग्रामदेवता). हे देऊळ नव्वदेक वर्ष प्राचीन आहे; तसं म्हटल तर ओरिजिनली थोडसं गावाबाहेर असतं ना, तसच - आमच्या घरापूढे मुळुंदची वेस संपायची पूर्वी! माझी आजी, आई व आता आमच्या अहो, मायाबाई; काहीतरी चांगलं घडलं की, व तसेच सणासुदीला, नर्मदा देवीची ओटी भरायला व पूजायला जात, व आजही जातात.
हीच ती नर्मदा मैय्या, हे माझ्या नापीक डोक्यातच आलं नाही, जेव्हा माझी मैत्रिण संध्या मला म्हणाली, की तिने नर्मदा परिक्रमा पूर्ण केली, चालत चालत.
मग तिच्याच कडून आम्ही परिक्रमेचं संपूर्ण वर्णन ऐकलं. आमच्या वर्गमित्रांच्या अँन्युअल गेट टूगेदर मध्ये. इन पीन ड्राँप सायलेन्स. माय गाँड! व्हाँट अँन एक्सपरियन्स. व्हाँट डिटरमिनेशन. व्हाँट अ पर्झव्हरन्स. आणि व्हाँट अ रिझाँल्व्ह!! हँटस् आँफ.
स्पेलबाऊंड! मेस्मेरायझिंग. अमेझिंग, आँसम असले इंग्लिश वर्णनशब्द कमी पडतीले. शुध्द मराठीत बोलायचं झाले तर ऐकताना अंगावर काटा - शहारा आला अक्षरशः
जवळ जवळ तेराशे किलोमीटर चा पायी प्रवास. नर्मदे हर, पावलोगणिक भक्तिभावाने उच्चारत. परिक्रमे दरम्यान संध्याला भेटलेली असंख्य अनोळखी माणसं; स्वत: शिधा शिजवून खाल्लेल अन्न; प्रसंगी मागितलेली भिक्षा - ओम भवती भिक्षांन् देही; स्वत: पेटवलेली तीन दगडांची मेक शिफ्ट चूल व या चूलीवरचा पोळीभात; आश्रमातील मुक्काम; जमिनीवर टेकलेलं दमलेलं अंग; ते परिक्रमा पूर्ण करताना अनुभूतलेली आत्मिक शांतता स्तब्धता. अवर्णनीय आनंद पूर्णत्वाचे आनंदाश्रू मिश्रित झालेलं दू:ख, अचंबित करणारे अनुभव (चमत्कार नव्हे); अडीअडचण व त्यातनंच आपसूकच मिळालेली मार्गवाट; भक्ती श्रध्दा विश्वास मोक्ष!!!
अहंपणाला तिलांजलि. आणि ज्या आंतरिक आत्मियतेने, प्रेमाने, वत्सलशुध्द भावाने, व अत्तिशय प्रामाणिकपणे, "मी" पण त्याज्यून संध्या हे वर्णन करत होती; तिच्याच कडून प्रत्यक्षबोलीनेच ऐकायला पाहीजे!
संध्याला त्रिवार साष्टांग नमस्कार!
नमामी देवी नर्मदे.
संध्या(राम) परिक्रमा(पूरण)...
---
Milinnd Kale, 19th July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment