Er Rational musings #603
कमीतकमी 2 पोळ्या, (जी केली असेल ती)भाजी, आमटी, काहीतरी गोड, कोशींबीर/चटणी/लोणचे, भात, व ताक/दही, दररोज जेवताना. हा होता आमच्या आज्जीचा दंडक. हे खायचेच. व च क! आज्जीला "नाही" म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आज्जी, आई व नंतर आमच्या "अहो" मायाबाई, या तिघीजणी सुगरण; व प्रचंड आवड करण्याची. पोळ्या चांगल्याच मोठ्ठ्या असायच्या. ऊजवीकडे, झाडून सगळ्या भाज्या, ऊसळी, पालेभाज्या आलटून पालटून, दररोज वेगळी. आमटी व भात स्टँन्डर्ड. तीन पाच दिवसापाठी पिठलं, वरण, गोळ्याची आमटी, सार असल काहीतरी. डावीकडे, जोडीला कुठली ना कुठली चटणी, लोणचं आहेच. गोड म्हणलं तर कुठलाबाठला पाक वा केळ्याची हक्काची कुस्करून शिकरण. अण्णा व बाबांना हवे असायचे, त्यामुळे आमच्याकडे मेतकूट व ताक, आवर्जून असायचं, त्यामुळे तेही, हमखास. सकस, चौरस आहार.
ह्याचा एक फायदा झाला. मी सर्व खायला शिकलो, सगळ्या भाज्या, सगळेच पदार्थ आवडीने मनापासून अगदी.
मला कल्पना आहे, तो काळ, ती वेळ, ते दिवस निराळे होते. आता या धकाधकीमध्ये पळापळी धावपळीमध्ये, शक्य तरी आहे का, व, गरज आहे का?! मिनिटा सेकंदाचे आपले दिवसभाग, 'बस्स टू मिनिटस्' चा जमाना, पोळ्यांना बाई, ही अपरिहार्हता, झटपट सटपट चटपट चवबदल, व रोज-रोज काय तेच-तेच ची हाकारी!!
पण नाही. आँल द मोअर सो नीडेड, नाऊ. अस माझं मत आहे. जमेल तसे जमेल तेव्हढे.
आजचा हा पंक्ती(उक्ती) प्रपंच कारण की, आमचे एक आवर्तन संपले आज आमच्याकडे. म्हणजे असे आहे की गेल्या काही महिन्यांपासून आमच्या अहोनी एक सुरू केलय, आम्हा सगळ्यांसाठी. एक खाद्य आवर्तन म्हणजे दररोज एक निराळी नवीन भाजी वा उसळ, लाईनीत झाडून सगळ्या, दररोज एक वेगळी. ही सायकल संपल्यावर थोडे दिवस रूटीन सुरू - म्हणजे रिपीटीशन ओके.
मुळामुठाचाकवतबिकवत, ते भोपळेवांगीमिरची, ते अळूघेवडाकारलशेपू, ते मटकीसटकीमूगवाल, ते जेजीमिळेलतेती.
अहोंमुळे, अनेकता में एकता, हरदिन, लाज़वाब...
---
Milinnd Kale, 6th July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment