Tuesday, July 12, 2016

Er Rational musings #617

Er Rational musings #617



कसा आहेस? या जनरल प्रश्नाला जनरल उत्तर असतय "मस्त" वा "मजेत".

कुठल्याही लेमँनच. किंवा कुठल्याही व्यावसायिकाला विचारा, काय, कसा चाललाय धंदा? (बिझिनेस). पंच्याण्णव टक्के लोकं, धंदेवाल्यांच उत्तर असत, "ठीकाय". मोस्ट प्रोबेबली, मग रडगाणं गायला सुरू होतं अशांचं, की, काही मजा नाही धंद्यात..परिस्थिति कधी सुधारणार माहीत नाही..उत्पादन आहे तर विक्री नाही..विक्री आहे तर पेमेंट नाही..पेमेंट आहे तर टँक्सेस ए्एव्हढे आहेत..टँक्सेस आहेत तर निरीक्षक वगैरे खाणारे आहेत..पाढाच वाचला जातो आपल्यापूढे अडचणींचा, अडथळ्यांचा, आडत्यांचा.



कसायना, जनरली आपण थोडे हातचे ठेवून बोलतो बरेचदा. थोडं रडल की बरं असतं असं म्हणत.



मानव स्वभाव विशेष.



आत्ताच्या व्हर्च्युअल विश्वात मात्र जरास वेगळेपण आहे. म्हणजे, उलटपक्षी आपण एव्हढे आतुर असतो, आपण 'कसे' आहोत ते जगाला (फ्रेंन्ड लिस्ट ला वा पब्लिक ला!!) सांगायला.



व्हाँट्सअँप वर आहे सुविधा 'स्टेटस्' ची व फेसबूक वर आहे सुविधा 'फिलींग्ज' ची. भावना व्यक्त करायला.

मज्जायना? मस्तच!



मला मात्र फब वर फिलींग्ज सांगायला (जगाला दाखवायला) वा व्हाँअँ स्टेटस् ठेवायला (जगाला दिसायला), प्राँब्लेम येतो. कारण, मला कोणी विचारले की मी काहीजणांना उत्तरतो, "जगतोय!"!! फब वा व्हाँअँ मध्ये या 'जगतोय' ला अजूनतरी स्थान नाहीये.



आज तर कहरच केला मी; एकाने विचारले, कसा आहेस, मी म्हणलं



"मोकळा!"...

---

Milinnd Kale, 12th July 2016

No comments:

Post a Comment