Friday, July 8, 2016

Er Rational musings #607

Er Rational musings #607



"हं, अभिनंदन!

झाला ना इंजिनियर; मस्त मार्कस् पडलेत ना? गूड. शेवटी डिग्री ती डिग्री, आता पूढे काय? कँम्पस इंटरव्ह्यू वगैरे..."



माझं आपल कौतुक सुरूच.



मित्र चांगलाच खुश होता. कष्टातून, मेहनतीने, त्याने स्वत: डिप्लोमा पूर्ण केलेला होता तीसेक वर्षांपूर्वी. मग परिस्थिति मुळे नोकरी, प्रपंच, आई ची काळजी, भाऊ बहिणी चे शिक्षण, व नंतर बहिणीचे लग्न, स्वत:चे लग्न संसार इत्यादि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत, आजचा दिवस, त्याच्यासाठी अत्यंत आनंदाचा.

" हो रे मिल्या. एकुलता एक मुलगा आज ग्रँज्यूएट झाला यार!!"



त्याची ती अवस्था बघून अक्षरशः गलबलून आलं मला आज. कारण पूढे काय? हेही मला ठाऊक होते. जीआरई व टोफेल दिलीवती पोरानं, व आत्ता उच्चशिक्षण, नँचरली. हल्ली एमई वगैरे नुंबईत कोणी करत नाही बहुतेक. डायरेक्ट एमएस फारेन, बहुधा, स्टेटस मध्ये.

मग, आलच, युनिव्हर्सिटी एडमिशन मिशन मग एज्यूकेशन लोन. मग दोन वर्षे एमएस यूएस मध्ये. मग तिकडेच कुठेतरी नोकरी करत करता करता पीएचडी कदाचित. मग कालांतराने तो तिकडेच, स्थायिक. खटपट करत, स्ट्रगल वगैरे ग्रीन कार्ड साठी. मग लग्न बिग्न बाळं मुलं, संसार....



हा माझा मित्र, बिच्चारा, एनआरआय पालक! एकदा यूएस बी एस ला शिकायला गेलेले परत भारतात येतात का? क्वचित, येस, आँदरवाईज मोस्ट आँफ द केसेस, ना ही!



मित्राच्या दृष्टीकोनातन्, गूड? वाईट? त्याने त्याच कर्तव्य बजावले, इतक व इतकच सोप सरळ आहे?



आय रियली डोन्ट नो.



एक मात्र सत्य आहे; माझ्या बघण्यात तरी कोणी परत आलेला नाहीये...

---

Milinnd Kale, 8th July 2016

No comments:

Post a Comment