Saturday, July 23, 2016

Er Rational musings #632

Er Rational musings #632



डाँबरमन, अल्सेशियन, जर्मन शेफर्ड, पाँमेरियन, बुलडाँग इत्यादि जगद्विविध प्रकारांचे कुत्रे असतात. पाळण्यासाठी मांजरा बरोबरीने कुत्र्यांना काही लोक्स अत्यंत वेडेपणाने उत्सूक असतात. आणि, देशी गावठी कुत्रे कोण पाळतच नाही बाँ.



या श्वानप्रेमींना "एक कुत्रा तर एक अनाथ बाळ", या धर्तीवर संगोपनाची दूहेरी जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडावे, असे माझ्या कुत्र्याचे "ब्रिस्टाँल, द बुलडाँग" चे मत आहे.

एव्हढे च जर कौतुक आहे, पैसा आहे, वेळ आहे, तयारी आहे, घरचाच माणूस होऊन जाणारे हा पाळीव प्राणी, हे सगळं मान्य आहे, तर. तो पूढे म्हणतो, एखादं अनाथ मुल दत्तक का नाही घेत ही श्वानप्रेमी मंडळी? एका हाडा मासांच्या गोळ्याचं आयुष्य बदलायचा विडा का नाही उचलत? का नाही रिअल बाळा ला पाळत, वाढवत, माया करत, आपलं नाव देत, त्याला स्वत:च्या पायांवर उभं करत...व त्याचे सगळेच म्हणणे अप्रस्तुत वा चूकीचे वा अति शहाणपणाचे वा अव्यवहार्य आहे, असेही ठामपणे म्हणता येत नाही!! असो. त्याचं मत त्याच्यापाशी. मुद्दा तो नाहीये.



मुद्दा असा आहे की, या पाळीव कुत्र्याला विंन्ग्रजीतन इन्स्ट्रक्शन्स (!) का शिकवल्या जातात, हा आहे! मस्तपैकी, छू, ये, जा, बस, असं म्हणावं की नाही सुटसुटीत? कशाला ते गो, कम, सिट, नो वगैरे?



का त्याला आपलं मर्राठी कमीपणाच वाटणारे का त्याच्या मालकाला लाज वाटते? बरं, नावं तर बघा - प्रिन्स, मेजर, ड्यूक, ओशन, एल्सा, ब्रूनो, ग्लाँसी इत्यादि. आता राजा, वाघ्या वगैरे अशी तत्सम का नसावीत? कुत्रा पाश्चात्य 'जातीचा' व नाव भाषा देशी, काय हरकत आहे भौ?



या लाडक्या पाश्चात्य पाळीव श्वापदाचे खाण्यापिण्याचे नखरे, मिजास, त्यांच्याबद्दल असलेले 'गाढवी' प्रेम, याविषयी पुन्हा केव्हतरी.



थांबतो; आता मात्र माझे श्वानप्रेमी मित्र मला मारतील..

---

Milinnd Kale, 24th July 2016

No comments:

Post a Comment