Er rational musings #635
कमजोर कड़ी कौन?
हा प्रश्न रस्त्यांवर पडणाऱ्या खड्यांशी संबंधित आहे. तो पण 'इन्व्हर्सली' नव्हे तर 'डायरेक्टली' प्रपोर्शनल!
सांगतो, कसा ते. जरा टेक्निकँलिटी समजून घेवूया. थ्थोड्ड सविस्तरपणे.
सिमेंन्ट काँन्क्रीट चे मेन रोड असतात. तसेच डांबरी पण. मँस्टीक अस्फाल्ट (डांबरच, पण थोडस उच्च प्रतीचे) चे ही असतात. पेव्हर ब्लाँक्स जनरली पदपथांसाठी वापरतात. काय, कुठे, कोणते व कसे, वापरायचे याचे काही मापदंड आहेत. आणि ह्या गाईड लाईन्स न पाळल्याने गोची होते.
दुसरे इनपूट, प्लीज नोट:
मुंबईत विविध कंपन्यांना अपरिहार्हतेमुळे रस्त्यांवर खोदकाम करायला लागते. भूमिगत वीज वाहिन्यांसाठी, 4 जणं आहेत. बेस्ट विद्युत पुरवठा, रिलायन्स एनर्जी, टाटा पाँवर, व एमएसईबी. टेलिफोन साठी एमटीएनएल व बीएसएनएल शिवाय 2-3 कंपन्या आहेत. घरगुती गँस साठी, महानगर गँस आहे. जवळजवळ 8 ते 9 कंपन्यांचे फायबर आँप्टीक नेटवर्क आहे, मोबाईल फोन सेवासुविधेसाठी. याव्यतिरिक्त मुंबई महानगरपालिका आहेच, पिण्याचे पाणी, स्यूएज-सांडपाणी व ड्रेनेज साठी.
लक्षात घ्या, की मुंबई चक्रवाढ व्याजदराने वाढली, वाढतीये. वीजेचे, पाण्याची, संपर्क दळणवळणाची, गँसची इ मागणी नुसती वाढतच नाहीये, तर ती डायनँमिक आहे.
लक्षात घ्या, की सर्व रस्त्यांवर वरील उल्लेखलेल्या सर्व एजन्सीज आठ महीने खोदकाम करत असतात. (पावसाळ्याच्या महिन्यांत चार महीने रस्ते खोदण्याची मुंबई महानगरपालिका परवानगी देत नाही, अगदी केबल फाँल्टस् वा नळ पाणी दुरूस्ती साठी पण स्पेशली वाँर्ड आँफीसरची परमिशन लागते!!) सेन्ट्रल को-आँर्डिनेशन कम प्लँनिंग नोडल बाँडी नाहीये मुंबईत. महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागते, तो भाग निराळा. कोण, कधी, कुठून कुठे, किती खुदाई करणारे याची माहीती सेंन्ट्रली अँव्हेलेबल नाही, नसते.
तसेच, 'यूटिलिटी काँरिडाँर' नावाचा प्रकारच अस्तित्वात नाहाये. त्यामुळे, कुणीही यावं, फूटपाथ, जंन्क्शन, रस्ता खणावा व निघून जावं, असाहे. नो दूरदृष्टी व प्लँनिंग.
लक्षात घ्या, की याव्यतिरिक्त उड्डाणपूल, मेट्रो रेल्वे, मोनो रेल, स्काय वाँक, ट्रँफीक सायनेजेस, सिग्नल्स...अशा अनेकविध कारणांमुळे बिचाऱ्या रस्त्यांवर खणती चालूच असते.
आता पुढे लक्षात घ्या, की रस्ता पूर्ववत करण्याची जबाबदारी, काम संपल्यावर, रस्ता जसा होता तसा रिसर्फेस करावा लागतो. इथे च माशी शिंकते.
खोदलेला पँच हा असातसाच कसाबसा कशानेही 'भरला' जातो. चांगल्या टार रोड च्या मधेच मग येतात पेव्हर ब्लाँक्स, वा सिमेंटचा पँच, वा कधी चक्क वीटा वा मातीखडी. थातुरमातुर. चूsssना! आणि मुळातच निकृष्ट दर्जा.
ही आहे कमजोर कड़ी!
आज बरोब्बर 11 वर्षांपूर्वी म्हणजे 26 जुलैला 2015 साली, आख्खी मुंबईच पाण्यात गेली होती, त्याची आठवण होतेय.
प्रलय, का मँन मेड डिझास्टर?
पाणी आपापली वाट शोधते. टप्पाटप पावसांच्या थेंबांमुळे इथून, या वीक लिंन्कपासून, कमजोर कड़ी पासून, सुरूवात होते. कुठेही जाँईंट आला, उंचसखलपणा आला, की; दोन विभिन्न मटेरियल्स एकत्र आले, तर यू कँन इमँजिन, कोणां तज्ञाची गरज नाहीये. छोट्टी छिद्रं मोठी मोठ्ठी होत जात जात मोठ्ठे खड्डे पडतात. ह्हे मोठ्ठाले - पहिल्या तिसऱ्याच पावसात!
आणि, एक सलग एका मटेरियलचा, अँटलीस्ट 250 मीटर लांबीचा तरी, एक तरी रस्ता उरलाय का? सगळीकडे नुसती ठिगळं लावलेली. कप्पाळ.
कसकाय होणार खड्डेमुक्त?
इतर बेसिक अत्यंत महत्वाच्या गोष्टींबद्दल तर काय बोलावं? प्रबंधच होईल.
टेक्नालॉजी; इंजिनियरिंग; रस्ते बनवण्याची प्रमाणपध्दत; मिश्रणात कितीचं काय प्रमाण; त्याचं क्यूअरिंग; स्लोप; शास्त्रोक्त बँन्कींग कर्व्ह - पाणी साठू नये, निचरा व्हावा म्हणून - नाहीतर रस्त्यावर पाण्याची डबकी (झिरपणं सुरूच) व साईडची गटारे कोरडी - कारण स्लोपच नाही! ते अगदी आपसातले नातेसंबंध व मधूर रूणानुबंध! या प्रत्येक विषयावर सेपरेट लिहावं लागेल. कारणमीमांसा.
कित्तीतरी 'खड्डे'शीर (कायदेशीर) मार्ग आहेत, इन अवर लाडकी मुंबई...
---
Milinnd Kale, 26th July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment