Tuesday, July 12, 2016

Er Rational musings #616

Er Rational musings #616



अनेक वर्षे नित्यनियमाने शेगावला जातोय. वर्षातनं एकदा.



श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव! इतर सर्व प्रसिद्ध प्रचलित भाविक ठिकाणं, दिवसेंदिवस बकालते कडे झुकताहेत. त्यांचं मँनेजमेंट दिवसेंदिवस ढिसाळ होताना दिसतय. बजबजपूरी वाढीला लागतीये सगळीकडे. बाजारीकरण होतय. अस्वच्छता. अनागोंदी. लूटमार. फसवाफसवी. काहीनाकाही वाद. सम्माननीय अपवाद वगळता, अर्थातच.



शेगाव ला उलटी गंगा वाहतीये, बरोब्बर विरूद्ध घडतय. दर वर्षागणिक काहीतरी नवीन, अभिनव, सुविधा, सोय..

स्वच्छततेसाठी संस्थान प्रसिद्ध होतच पहिल्यापासून. संस्थानाचे आवार वाढलेय, स्वच्छततेने परिसीमा गाठलीये. शांतता. प्रसन्न शांतता. सेवाभावी कार्यतत्पर. आधुनिकीकरण झालच आहे, होतय. सीसीटीव्ही यंत्रणा असो वा भक्तनिवासचं आँन लाईन बूकींग असो. चपला ठेवायची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह स्नान गृह, दर्शनाची शिस्तबध्द रांग, दर्शनाची व्यवस्था, महाप्रसाद, देणग्या स्विकारण्याची व प्रसाद वाटपाची व्यवस्था ते सुरक्षा व्यवस्था, ते शिस्तबध्द शांत सुरळीत स्वच्छ पांढरेशुभ्र मदततत्पर सेवाभाविक. हे सगळं अनुभवूनच प्रसन्न वाटतं.



यावेळेस, महाप्रसादच्याच प्रासादात, हाँल मध्ये माता भगिनींसाठी नवजात दूधपित्या बाळांसाठी चोख, वेगळी व्यवस्था आहे.



याच्यावर कडी, कळस म्हणजे महाराजांचे दर्शन!



महारांजांच्या चरणी, झाडून सारे xx xx तेरा टक्के. व्हिआयपी दर्शन, xx रोकड्याची ती लाईन, xxx रोकड्याची ही लाईन, असली थेरंगैरता नाही, स्थानच नाही असल्या भंपकतेला.



गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज प्रसन्न...

---

Milinnd Kale, 12th July 2016



Read more on

Website: www.milindkale.com and blog: milindmkale.blogspot.in



Enjoy...

No comments:

Post a Comment