Friday, July 1, 2016

Er Rational musings #598

Er Rational musings #598



अर्रा



~ व्वा काय पाऊस आहे.

~ मस्त पाऊस.

~ फिलींग ब्लेसड्

~ फिलींग डिव्हाईन

~ फिलींग हँप्पी

~ याशिवाय कुठलेकुणीकडचे फिलींग ते तेच जाणो



आणखीन कायकाय बोलताहेत, 'पोस्ट'ताहेत सकाळपास्न. समदी जणं.



पण कायय ना, ह्ये नुस्ते फोटो, सेल्फी व काँमेंटा वाल्यांना ठीकठाकाय. घरी बसून वा सोसायटीच्या आवारात मज्जाचमज्जा.



जर्रा



~ लोकल प्रवास करताना अडकलेले

~ ट्राँफीक(!) मध्ये फसलेले

~ गुडघाभर तुंबलेल्या पाण्यावर वैतागलेले

~ विलेक्ट्रिकसिटी गुल झाल्यामुळे संतापलेले

~ बस्टाँप वर थांबलेले

~ रिक्शा टँक्सी नसल्याने बिथरलेले



रंजलेले गांजलेले लोकं हैएत ना त्यास्नी इचारून बघा!



चर्चेलाही तस उधाण येत अशावेळी. पाहीजेच होता, पड म्हणावं पड. कँचमेंट एरीयात पण पडतोय ना? मग बराय. वगैरे वगैरे. परंतु जगायला पाऊस हवाच, नाही का? किती, कुठे, कधी, कसं पडायचं, ते फक्त नि फक्त पर्ज्यनराजालाच ठाव व भावं.



सहाजिकच आहे ओ, बट "नँचरल".



प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच. (ते काय शोले मधलं नाणं आहेकाय, अमिताभच?) आपणच कलप्रिट आहोत; त्याला पूढेपाठी करायला आपला निसर्गनिष्काळजीपणा बऱ्याच अंशी ककारणीभूत आहे! अब झेलो.



कुछ पाने के लिये कुछ खोना पड़ता हैं...

---

Milinnd Kale, 1st July 2016

No comments:

Post a Comment