Er Rational musings #625
~ चतुर्थी, एकादशी, संकष्टी ला उपवास न करणाऱ्याsss
~श्रावण, चातुर्मास न पाळणाऱ्याsss
~ सोमवारी, मंगळवारी, गुरूवारी पण अभक्ष भक्षण करणाऱ्याsss
~ गणपती, दसरा, दिवाळी ला सुध्दा काहीही खाणाऱ्याsss
~ माणूस सोडला तर इतर काहीही (शेण!) वर्ज्य नसणाऱ्याsss
~ सगळच सोडलय म्हटल्यावर काय कप्पाळ बोलणारsss
~ धर्मबुडव्या, बाटलेल्या भटा ssss
अराराराssss
अब्रूची लक्तरच काढली राव. अद्वातद्वा बोलला. होती नव्हती तेव्हढी, उरली सुरली इज्जत गेली ना आपली. काही आत्मसन्मान वगैरे काही आहे की नाही.
मी त्याला नेहमी म्हणतो, की ते कँलेंडर भिंतीवरनं काढून टाक बाबा. तसंअसं बघाल तर मग दररोजच काही ना काही असतय मार्कींग. (हे कँलेंडरवाले पण ना...) नायतर, कोणाला कळणारे? दिवसा सारखा दिवस! आणि काय कंदमुळं खायची का? आणि हेच हे सो काँल्ड धर्मरक्षक, परदेशी गेले असले, स्थायिक झाले, की कायकाय दिवे लावतात (सगळेच नव्हे!) ते बघना जाऊन.
का आपलं या पर्टिक्युलर अक्षांश रेखांशावर चालतय - विषुववृत्तावर नाही चालत, असलंबासलं पण हायलाईट केलय का? नसलं, तर, हे पण करतील, कोणी सांगावं...
माझा युक्तिवाद. हिरीरीने प्रतिवाद.
छ्छ्या, तूझ्याशी ना, काहीच बोलण्यात अर्थ नाहीये. कुठती गोष्ट कोठे नेतोस. आडमुठेपणा. अडेलतट्टूपणा...त्याला काही माझं असलं (तसलं) बोलणं रुचलं नाही.
आणि, मलाही त्याच पटलं नाही...
---
Milinnd Kale, 15th July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment